निदा खान 21दिवसांपासून फरार; पोलिसांच्या हाती लागेना, गरोदर असल्याच्या माहितीने तपासाला नवं वळण
नाशिक : नाशिकमधील धर्मांतर प्रकरणातील मास्टरमाईंड संशयित महिला आरोपी निदा खान (Nida Khan) हिच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून ती सध्या गरोदर असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी निदा खानने (Nida Khan) नाशिकरोड न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता असून न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणात निदा खान (Nida Khan) २१ दिवसांपासून फरार असून नाशिक पोलिसांनी तिच्या शोधासाठी विशेष पथके नियुक्त केली आहेत. विविध ठिकाणी तपास सुरू असून तिच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.(Nashik Crime News)
या प्रकरणामुळे आधीच खळबळ उडाली असताना आता गरोदर असल्याचा मुद्दा पुढे आल्याने कायदेशीर प्रक्रियेला वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अटकपूर्व जामीनाबाबत न्यायालयाचा निर्णय या प्रकरणातील पुढील कारवाई ठरवणार असल्याने सर्वांचं लक्ष या सुनावणीकडे लागले आहेत.
Nida Khan: धर्मांतरासाठी तरुणींवर टाकला दबाव
निदा खानवर अत्यंत गंभीर आरोप आहेत. प्रतिष्ठित कंपनीत काम करणाऱ्या तरुणींना हेरून, त्यांचे ब्रेनवॉश करणे आणि त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी मानसिक दबाव टाकणे, असे कृत्य ती करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे मोठे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, निदा खानच्या अटकेनंतर अनेक मोठे खुलासे होऊ शकतात.तरुणींच्या धर्मांतरासाठी वापरण्यात येणाऱ्या या ‘मोडस ऑपरेंडी’मुळे नाशिकसह राज्यभरात संतापाची लाट आहे. निदा खानने जामिनासाठी अर्ज केला असला, तरी पोलीस या अर्जाला न्यायालयात जोरदार विरोध करण्याची शक्यता आहे. ती वारंवार आपली ठिकाणे बदलत असल्याने तिला पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.
मुख्य सूत्रधार असलेली निदा खान मात्र गेल्या 20-21 दिवसांपासून फरार आहे. कंपनीमध्ये मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून निदा खान काम बघत होती. आरोपींना दररोज कामाचे नियोजन देण्यासाठी होणाऱ्या मीटिंगमध्ये हिंदू मुलींची छळवणूक आणि त्यांच्यावर धर्मांतराचा तगादा लावण्यासाठी निदा खान (Nida Khan) ऑपरेशन डिपार्टमेंट म्हणून या सर्व गोष्टी घडवून आणत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे.
गेला वीस दिवसांपासून निदा खान फरार आहे. निदा खानच्या (Nida Khan) मागावर पोलिसांचे तीन पथक रवाना करण्यात आले आहे, मात्र अद्यापही तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. या कंपनीतील तरुणींना आणि महिलांना मानसिक छळवणूक आणि लैंगिक अत्याचार होताना धर्मांतर करण्याचा मुख्य उद्देश ठेवून अनेक कारनामे या निदा खानच्या सांगण्यावरून घडत होत्या अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. कंपनीची HR अश्विनी चैनाणी हिला पोलिसांनी अटक केली आणि तिची कसून चौकशी केली असता. या प्रकरणात निदा खान (Who Is Nida Khan) ही हे सर्व घडवून आणत असल्याचं पोलीस तपासात समोर आली आहे.
Who Is Nida Khan: कोण आहे निदा खान?
बोट – निदा एजाज खान
वय – 26 वर्ष
– कंपनीतील टीम लीडर ची प्रमुख आणि कंपनीत काम करणाऱ्या मुलींची टार्गेट टीम प्रमुख म्हणून काम करत होती.
– 2021पासून निदा खान ही कंपनीत काम करत होती.
– नाशिकच्या द्वारका परिसरात निदा खान हिचे माहेर असून तिचे पती एका खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती आहे.
– कंपनीत नवीन महिला किंवा तरुणी कामाला आल्यानंतर त्यांना या आरोपीकडून ट्रेनिंग देण्याची शिफारस निदा खान करत असे.
– आरोपींच्या प्रेमात आणि ठरवलेल्या धर्मांतर षड्यंत्रात मुली अडकवण्यासाठी तिची मुख्य भूमिका होती.
– या प्रकरणात आर्थिक मदत लागत असेल तर इतर आर्थिक मदत आरोपींना आवश्यक नुसार करत होती.
– निदा खान तिच्या अटकेमुळे या संपूर्ण प्रकरणातील मास्टरमाइंड नेमका कोण आहे याचा खुलासा होणार असल्याने तिची अटकेची कारवाई महत्त्वाची आहे.
– या संपूर्ण प्रकरणाची सूत्रधार म्हणून निदा खान ही असल्याने पोलिचे तीन पथक निदा खानच्या मागावर असून तपास सुरू आहे.
Nida Khan : निदा खान ही एका सर्वसामान्य घरातील पण…
निदा खान ही एका सर्वसामान्य घरातील असल्याची माहिती आहे. तिचे लग्न 2021-22 मध्ये एजाज खान सोबत झाल्याची माहिती असून एका नामांकित महाविद्यालयात तिचे शिक्षण ही पूर्ण झाल्याची माहिती आहे. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून एका नामांकित कंपनीमध्ये निदा ही सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करत असल्याचा देखील समोर आले आहे. मात्र या प्रकरणात निदा खानवर मुख्य सूत्रधार म्हणून आरोप झाल्याने या प्रकरणात तिची अटक ही नाशिक पोलिसांसाठी आणि या प्रकरणातील उलगडा होण्यासाठी सर्वाधिक निर्णय होणार आहे. निदा खानचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असल्याचा देखील संशय तपास यंत्रणे कडून व्यक्त केला जातोय.
आणखी वाचा
Comments are closed.