जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा द्या, पण…; नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबियांचा
नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील कॉर्पोरेट कंपनीत घडलेल्या लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील संशयित शफी शेख आणि रझा मेमन या दोघांना गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आवारात आरोपींच्या नातेवाइकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना “पूर्ण समाजाला टार्गेट केले जात आहे,” असा खळबळजनक आरोप केला आहे.
गुरुवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. सी. नरवाडिया यांच्यासमोर सुमारे अर्धा तास दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला. सहाय्यक संचालक किरण बेंडभर आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता अनिकेत आव्हाड यांनी सांगितले की, जरी गुन्ह्याची पद्धत (Modus Operandi) एकसारखी असली, तरी पीडित महिला वेगवेगळ्या आहेत आणि गुन्हे वेगवेगळ्या काळात घडले आहेत. संशयितांच्या मोबाइलमधील तांत्रिक माहिती आणि व्हॉट्सॲप चॅटिंग मिळवणे अद्याप बाकी असून, तपासाची व्याप्ती मोठी असल्याने पोलिस कोठडीची गरज आहे.
Nashik Crime News: बचाव पक्षाचा युक्तिवाद
संशयितांच्या वतीने वकील राहुल कासलीवाल यांनी बाजू मांडली. सर्व गुन्हे एकाच कंपनीत घडले असल्याने त्यांची स्वतंत्र सुनावणी न घेता एकत्रित सुनावणी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला. या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झाले असून, 8 महिला आणि एका पुरुषाने फिर्याद दिली आहे. मुख्य संशयित दानिश शेख, आसिफ अन्सारी, तौसिफ अत्तार आणि शाहरुख कुरेशी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
Nashik Crime News: आरोपींच्या कुटुंबीयांचा आरोप
न्यायालयीन सुनावणीच्या वेळी संशयितांचे नातेवाईक मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी एका नातेवाइकाने प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली बाजू मांडली. जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. जे गुन्हेगार नाही त्यांना खोटा केसेसमध्ये टाकून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. त्यांचे घरचे हैराण झाले आहेत. संपूर्ण समाजाची बदनामी सुरू आहे. गुन्हेगार एक असतो पूर्ण समाज गुन्हेगार नसतो. मुस्लिम समाजाच्या विरोधात मोर्चे काढले जात आहेत. यात समाजाचा काय संबंध आला? संपूर्ण समाजाला टार्गेट केले जात आहे. जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे मात्र जे गुन्हेगार नाहीत त्यांना बळजबरी टार्गेट केले जात आहे. दोषींना शिक्षा व्हावी. जे दोषी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्या, आम्ही त्यांना पाठीशी घालत नाही. परंतु ज्यांनी गुन्हा केलेला नाही, त्यांना खोट्या केसेसमध्ये गोवण्याचे काम सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. तर, हिंदुत्ववादी संघटनांवर आमचा आक्षेप आहे. या शहरात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.