पत्नी बचावासाठी अर्धा तास ओरडत होती, लहान मुलगाही अडकलेला; खरातच्या निकटवर्तीयाचा अपघातात मृत्य

नाशिक : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचा (Ashok Kharat) निकटवर्तीय जितेंद्र शेळके (Jitendra Shelke) यांचा आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अपघातात मृत्यू झाला आहे. संभाजी नगरहून शिर्डीला जात असताना त्यांच्या कारता भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात जितेंद्र शेळके (Jitendra Shelke) यांच्यासह त्यांच्या पत्नीचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातातबाबात मिळालेल्या माहितीनुसार उभ्या कंटेनरला कारची पाठीमागून धडक दिली असल्याची माहिती आहे. कार थेट कंटेनरखाली घुसली आहे. या अपघातात जितेंद्र शेळकेंचा (Jitendra Shelke) आणि पत्नीचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल आहे. (Nashik Crime News)

अशोक खरातांचे सहकारी जितेंद्र शेळके मृत्यू: कंटेनर वाचक जोर धडक दिली

या भीषण अपघाताबाबात प्रत्यक्षदर्शी आणि संभाजीनगर शिर्डी महामार्गावर अपघाता झाला तेथील धोत्रे गावचे सरपंच प्रदीप चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की, हा अपघात साधारणपणे दुपारी १२:३० च्या सुमारास समृद्धी महामार्गावरील किलोमीटर ५०६.६ जवळ झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच सरपंच आणि ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी पोहोचले. कारमध्ये एक महिला, एक पुरुष आणि एक १०-१२ वर्षांचा मुलगा होता. मुलाला तातडीने कारबाहेर काढून रुग्णवाहिकेने रुग्णालयात रवाना करण्यात आले. मुलाने स्वतःचे नाव आणि जितेंद्र शेळके यांचा मुलगा  असल्याची माहिती दिली. या अपघातात दोन लोकांचा (जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा) जागीच मृत्यू झाल्याचे सरपंचांनी सांगितले. (Nashik Crime News)

Jitendra Shelke Death: कारमध्ये अडकलेल्या महिलेला कदाचित वाचवता आले असते

सरपंच प्रदीप चव्हाण यांनी बचाव कार्यासाठी लागणाऱ्या क्रेनच्या दिरंगाईवर भाष्य केलं आहे. अपघात १२:३० ला झाला, पण क्रेन दुपारी २:१५ ला पोहोचली. म्हणजेच तब्बल पावणे दोन तास उशीर झाला. जर क्रेन आणि मदत अर्ध्या-पाऊण तासात मिळाली असती, तर कारमध्ये अडकलेल्या महिलेला कदाचित वाचवता आले असते, असा दावा त्यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, अनुराधा जितेंद्र शेळके या कारमध्ये पुढे होत्या त्या आतमध्ये अडकल्या होत्या, त्यांचा पाय फक्त आम्हाला दिसत होता, त्यांना बाहेर काढता आले नाही, मुलाला मोठ्या प्रयत्नानंतर बाहेर काढले, असंही त्यांनी सांगितलं आहे, तर अपघातानंतर अनुराधा जितेंद्र शेळके बचावासाठी ओरडत होत्या.

अपघात झाला अशी माहिती मिळाली तेव्हा आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचलो होतो, कार मागून कंटेनरमध्ये घुसलेली होती. मुलाला आम्ही बाहेर काढलं, त्याचा हात तुटला होता, त्याला तातडीने रूग्णालयात दाखल केलं, त्या बचावासाठी अर्धा तास ओरडत होत्या, पण त्या आतमध्ये अडकल्या होत्या, त्यांना बाहेर काढता आलं नाही, त्यांना बाहेर काढता आलं असतं तर त्यांचा जीव कदाचित वाचला असता असंही प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे.

अशोक खरातांचे सहकारी जितेंद्र शेळके मृत्यू : जितेंद्र शेळके कोन?

जितेंद्र शेळके हे खरातच्या शिवनिका ट्रस्टचे शेळके उपाध्यक्ष राहिले आहेत. शेळकेंच्या लाॅन्समध्येही खरातची भागिदारी होती. खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके तणावात होते. खरातचे कारनामे बाहेर येताच शिवनिका संस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष शिर्डीतील जितेंद्र शेळके आणि सुभाष गमे यांनी आपल्या पदाचा राजीनामा होता. हे राजीनामे थेट नाशिकच्या धर्मादाय आयुक्तांकडे पाठवण्यात आले होते.

Jitendra Shelke Death: डॉ. जितेंद्र शेळकेंचा अपघात की घातपात? : आमदार अमोल मिटकरी

भोंदू अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकें अपघात प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी मोठी प्रतिक्रिया. चौकशी लागलेली असतानाच दोन दिवसात शेळके यांचा अपघाती मृत्यू. शेळके यांचा अपघात की घातपात? हा मोठा संशय आहे. जितेंद्र शेळके यांच्या वाहनाचे ब्रेक फेल झाले होते की केले गेले होते? याचा शोध घेतला गेला पाहिजे, अशी आमदार अमोल मिटकरी यांची मागणी. अशोक खरात प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न होत आहे का?, कारण या अपघातामुळे आता खरात प्रकरण सोपं राहलं नाही. गेल्या 3 महिन्यापासून अजित दादांच्या अपघातापूर्वीचे CCTV फुटेज समोर येऊ शकले नाही, त्यामुळे जितेंद्र शेळके यांचा अपघात की घातपात? या मागील खरं सत्य महाराष्ट्र समोर येणारचं नाही, अशीही खंत आमदार अमोल मिटकरींनी केली व्यक्त. शेळके यांची दोन दिवसापूर्वी चौकशी होते, आज चौकशी भौऱ्यात असलेल्या व्यक्तीचा अशाप्रकारे अपघाती मृत्यू दाखवल्या गेल? याचं खरं सत्य कधी समोर येणार, याबाबत आता मनात मोठी शंका असल्यास मिटकरी म्हणाले.

आणखी वाचा

Jitendra Shelke Accident Ashok Kharat Case: अशोक खरातला अटक होताच तणावात गेले, आज कार थेट कंटेनरखाली घुसली; जितेंद्र शेळकेंसह पत्नीचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?, PHOTO

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.