पराभवानंतर मुंबईच्या संघात फूट? बुमराह-हार्दिकमध्ये भर मैदानात ठिणगी, व्हायरल व्हिडिओ पाहून सगळ

मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 : मुंबई इंडियन्सच्या गोटातून येणाऱ्या बातम्यांनी चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या पराभवानंतर आता मैदानावरील तणाव सोशल मीडियावरही दिसू लागला आहे. एका व्हायरल व्हिडिओमुळे हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्यात सर्व काही ठीक आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सामन्यादरम्यान दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याचे दिसत असून, त्यामुळे संघात काहीतरी बिनसल्याची चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

मुंबईचा सलग चौथा पराभव

सलग चौथ्या पराभवामुळे पाच वेळा आयपीएल जिंकलेल्या मुंबई इंडियन्सची अवस्था खराब झाली आहे. पंजाबविरुद्ध 196 धावांचे लक्ष्य बचावण्यासाठी उतरलेल्या मुंबईच्या गोलंदाजांना चांगलीच धुलाई झाल. मात्र या पराभवापेक्षा जास्त चर्चा त्या व्हिडिओची आहे, ज्यात बुमराह आणि हार्दिक यांच्यातील मतभेद स्पष्ट दिसत आहेत.

मैदानावर बुमराहची नाराजी, हार्दिकचा निर्णय

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बुमराह हे कर्णधार हार्दिक पांड्याच्या एका निर्णयावर नाराज होताना दिसतात. सामन्याच्या महत्त्वाच्या क्षणी हार्दिकने बुमराहचा सल्ला न ऐकता स्वतःच्या रणनीतीनुसार फिल्ड सेट केली. यावर बुमराह काही वेळ चर्चा करतात, पण शेवटी नाराज होऊन कर्णधाराचा निर्णय मान्य करतो. त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती.

सामन्यानंतर हार्दिकचा संताप

पराभवानंतर हार्दिक पांड्या चांगलाच संतापलेला दिसला. त्याने संघाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत मोठे बदल करण्याचे संकेत दिले. हार्दिक म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचं तर सध्या माझ्याकडे शब्द नाहीत. आपण परत जाऊन चुका कुठे झाल्या हे पाहायला हवं. ही वैयक्तिक चूक आहे, संघाची समस्या आहे की प्लॅनिंग फेल झालं आहे, हे समजून घ्यावं लागेल. कठोर प्रश्न विचारण्याची आणि जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे.” त्याने पुढील सामन्यांमध्ये काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देणे किंवा संघरचनेत मोठे बदल होण्याची शक्यता देखील व्यक्त केली.

स्टार खेळाडू अपयशी, गोलंदाजी निष्प्रभ

या सामन्यात क्विंटन डी कॉक याने शानदार शतक झळकावले, तर नमन धीरने अर्धशतक केले. मात्र उर्वरित फलंदाज अपयशी ठरले. बुमराह सलग पाचव्या सामन्यात विकेटसाठी झगडताना दिसले आणि त्याने 41 धावा दिल्या. हार्दिक पांड्यानेही फक्त 14 धावा केल्या आणि गोलंदाजीत 3 षटकांत 39 धावा खर्च केल्या.

पुढचा सामना करो या मरो

मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना 20 एप्रिलला गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे.

हे ही वाचा –

Virat Kohli Likes LizLaz Photo: विराट कोहलीने आता अफ्रिकेच्या मॉडेलचा लाईक केला फोटो; सोशल मीडियावर धुमाकूळ, कोण आहे LizLaz?

आणखी वाचा

Comments are closed.