हा अपघात घडवून आणला नाही ना? खरातच्या निकटवर्तीयाचा मृत्यू; रोहित पवार, सुषमा अंधारेंना संशय, ख

जितेंद्र शेळके अपघात : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे (Ashok Kharat) निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके (Jitendra Shelke) यांचा समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघातात (Accident) मृत्यू झाला. संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ त्यांच्या कारने उभ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कार कंटेनरखाली घुसली. या अपघातात शेळके आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अशोक खरातला अटक झाल्यापासून शेळके तणावात असल्याची माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Rohit Pawar on Jitendra Shelke Accident : काय म्हणाले रोहित पवार?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष आणि भोदू अशोक खरात याचे सहकारी जितेंद्र शेळके यांचं अपघाती झालेलं निधन अतिशय धक्कादायक आहे. अजूनही पुढं न आलेले भोंदूचे इतर काही कारनामे पुढं येऊ नयेत आणि यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये, म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना, अशी शंका येते. या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसंच भोंदू खरातच्या चौकशीतही अनेक बाबी पुढं येणार असल्याने त्याच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Sushma Andhare on Jitendra Shelke Accident : काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

तर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवर व्हिडीओ जारी करत म्हटले आहे की, खरात प्रकरणातील एक महत्त्वाची कडी शिवनिका ट्रस्टचे संचालक शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. मला ही गोष्ट अविश्वसनीय वाटते. अनेक दिवसांपासून अनेक नेत्यांनी भीती व्यक्त केली होती की, खरातच्या जीवाला धोका असू शकतो. आजची जी घटना घडली त्या घटनेने या शक्यतेला अधिक ठळक पद्धतीने अधोरेखित केले आहे. खरात प्रकरणातील काही सत्यच बाहेर येऊ नयेत, असे काही लोकांना वाटत आहे का? एसआयटी अजून देखील तपासाची गती वाढवत नसेल आणि या लोकांच्या चौकशा होत नसतील तर आणखी जास्त संशयाचे धुकं वाढत चालले आहे. शेळके हे गुन्हेगार होते की नव्हते? हे कायद्याने ठरवले असते. कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. पण, आजची घटना घडली ती शासन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा

Jitendra Shelke Accident Ashok Kharat Case: अशोक खरातला अटक होताच तणावात गेले, आज कार थेट कंटेनरखाली घुसली; जितेंद्र शेळकेंसह पत्नीचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?, PHOTO

आणखी वाचा

Comments are closed.