निदाचा पती मोईन खान याला मुंब्य्रातून उचलले
नाशिकमधील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या निदा खान या महिलेच्या प्रकरणाने नाटय़मय वळण घेतले असून पोलीस तपासात नवनवे खुलासे समोर येत आहेत. नोकरी गमावल्यापासून सुरू झालेल्या घटनाक्रमाने आता गुन्हेगारी स्वरूप धारण केले आहे. दरम्यान, निदा खान हिच्या पतीला एसआयटीच्या पथकाने मुंब्य्रातून उचलले असून या प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे.
नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये कार्यरत असलेल्या महिला आरोपी निदा खानप्रकरणी नाशिकच्या देवळाली
कॅम्प पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाला वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे माहेरचे नाव निदा एजाज खान तर सासरचे नाव निदा मोईन खान आहे. 26 वर्षीय निदा मूळची नाशिकमधील अशोका मार्ग परिसरातील रहिवासी असून ती टीसीएस या नामांकित आयटी कंपनीत कार्यरत होती. दरम्यान, तिचा पती मोईन नावीद इकबाल खान (27) याला मुंब्रा येथील अमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस) कंपनीत लॉजिस्टिक ऑफिसर म्हणून नोकरी मिळाल्याने तो फेब्रुवारीमध्ये मुंब्य्रात स्थलांतरित झाला. त्यानंतर निदा हिनेही ट्रान्सफर घेऊन मुंबईत पतीसोबत राहण्यास सुरुवात केली. ती मालाड आणि हिरानंदानी परिसरातील टीसीएस कार्यालयात ये-जा करत होती. मात्र 9 एप्रिल रोजी तिला नोकरीवरून कमी केल्याची नोटीस कंपनीकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Comments are closed.