उन्हाळी हंगामात लालपरीच्या दररोज 812 जादा फेऱ्या, उन्हाळी हंगामात लालपरीच्या दररोज 812 जादा फेऱ्या; शाळांची सुट्टी लांबल्याने तूर्तास टप्प्याटप्प्याने गाड्या धावणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

उन्हाळी सुट्टीच्या हंगामात एसटी महामंडळाच्या राज्यभरात दररोज 812 अतिरिक्त बसफेऱया धावणार आहेत. यंदा शाळांना सुट्टी पडण्याचा दिवस 24 एप्रिलपर्यंत लांबला आहे. ही सुट्टी सुरू झाल्यानंतर एसटीच्या विशेष फेऱ्या पूर्ण क्षमतेने धावणार आहेत. तूर्तास प्रवाशांच्या प्रतिसादानुसार टप्प्याटप्प्याने जादा बसफेऱया सोडण्याच्या सूचना एसटी महामंडळाने सर्व विभागांतील आगारांना दिल्या आहेत.

शाळा-महाविद्यालयांच्या उन्हाळी सुट्टीत एसटीच्या बसगाडय़ांना मोठी मागणी असते. त्या अनुषंगाने एसटी महामंडळामार्फत दरवर्षी 15 एप्रिल ते 15 जून अशा उन्हाळी हंगामात जादा बसफेऱयांचे नियोजन केले जाते. यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळा 24 एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याने महामंडळाला उन्हाळी विशेष फेऱया नियोजनात बदल करावा लागला आहे. अद्याप शाळा सुरूच असल्यामुळे तूर्तास प्रवाशांच्या प्रतिसादानुसार टप्प्याटप्प्याने जादा फेऱया सोडण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून सर्व आगारांना दिल्या आहेत. शाळांना सुट्टी न पडल्यामुळे मागील दोन दिवसांत मुंबई सेंट्रल आणि परळ डेपोमधून अपेक्षित जादा बसफेऱया न सोडल्याचे संबंधित अधिकाऱयांनी सांगितले. महामंडळाने राज्यभरात 812 ज्यादा फेऱयांचे नियोजन केले आहे. मुंबई विभागातून रोज 202 बसफेऱया धावणार आहेत. 24 एप्रिलपासून 15 जूनपर्यंत जादा फेऱया पूर्ण क्षमतेने धावणार आहेत. प्रवासी महामंडळाच्या अॅप आणि संकेतस्थळावर आगाऊ बुकिंग करू शकणार आहेत.

यंदा शाळांच्या सुट्टीचा दिवस बदलल्याने एसटी महामंडळाने सध्या प्रवाशांच्या प्रतिसादानुसार टप्प्याटप्प्याने जादा बसफेऱया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 24 एप्रिलला शाळांना सुट्टी सुरू झाली की जादा फेऱया पूर्ण क्षमतेने चालवल्या जातील.

z नितीन मैद, वाहतूक महाव्यवस्थापक

विभागनिहाय जादा फेऱ्या

मुंबई -202

छत्रपती संभाजीनगर -194

नागपूर-24

पुणे-232

अमरावती -56

नाशिक -104

राज्यातील 66 हजार

Comments are closed.