संगमनेरमध्ये ‘भोंदूगिरी’चा पर्दाफाश! मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा राजेंद

अहिल्यानगर क्राईम न्यूज: मंत्रोच्चार आणि दैवी शक्तीच्या नावाखाली दुर्धर आजार बरे करण्याचा खोटा दावा करून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगे (Rajendra Gadge) याच्या मुसक्या आवळण्यात संगमनेर पोलिसांना (Sangamner Police) यश आले आहे. तालुक्यातील वडगावपान येथे ‘दत्तधाम सरकार’ नावाने दरबार भरवून फसवणूक करणाऱ्या या भोंदूविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Ahilyanagar Crime News: काय आहे प्रकरण?

राजेंद्र बापू गडगे याने वडगावपान परिसरात स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचे भासवून ‘दत्तधाम सरकार’ नावाचे यूट्यूब चॅनल सुरू केले होते. या माध्यमातून तो कर्करोगासारखे गंभीर आजार मंत्रशक्तीने बरे करणे, मूल नसलेल्या महिलांना मूल प्राप्त करून देतो तसेच घरातील विविध समस्या दूर करण्याचे खोटे दावे करत असे. या आमिषाला बळी पडून अनेक नागरिक त्याच्या दरबारात हजेरी लावत होते.

अहिल्यानगर क्राईम न्यूज : अकरा हजार ते एक्कावन्न हजारांचा दरोडा

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, समस्या निवारणासाठी हा भोंदू भक्तांकडून 15 हजार, 21 हजार ते अगदी 51 हजार रुपयांपर्यंतची रक्कम उकळत असे. उपचाराच्या नावाखाली पालापाचोळ्याचे औषध देऊन रुग्णांच्या जिवाशी खेळ केला जात होता. गेल्या 10 वर्षांपासून त्याने शेकडो लोकांचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

Ahilyanagar Crime News: अंनिसच्या पुढाकाराने गुन्हा दाखल

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी राजेंद्र गडगेसह त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, डॉ. मोहन पुरी, सुरज शिंदे आणि मधुकर शिंदे अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा कारवाई करत मुख्य आरोपी राजेंद्र गडगे आणि मधुकर शिंदे या दोघांना अटक केली असून, इतर तिघांचा शोध सुरू आहे.

Ahilyanagar Crime News: कडक कलमान्वये कारवाई

आरोपींवर जादूटोणा विरोधी कायदा, आयटी (IT) ॲक्ट, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बनावट व्हिडिओ बनवून लोकांची दिशाभूल केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आणखी वाचा

Ashok Kharat Crime News: अशोक खरातविरोधात तक्रारींचा पाऊस, हेल्पलाईनवर 23 दिवसांत शेकडो कॉल्स, आतापर्यंत 15 गुन्हे दाखल, आज भोंदूबाबाला पुन्हा कोर्टात हजर करणार

आणखी वाचा

Comments are closed.