तरुणीच्या गळ्यातील तुळशीमाळ अन् हातात बांधलेला दोरा काढला, मानेवर लव्ह बाईट, नाशिकमधील आणखी एक

नाशिक क्राईम न्यूज : शहरातील नामांकित आयटी कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक छळवणुकीचे प्रकरण ताजे असतानाच, नाशिकमध्ये (Nashik Crime News) आणखी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीला बळजबरीने दारू आणि सिगरेट पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आला, इतकेच नव्हे तर तिला धर्मांतरासाठी प्रवृत्त करत तिच्या धार्मिक भावना दुखावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी (Panchavati Police) संशयित आरोपी तंजीर इनामदार याला अटक केली आहे.

पीडित तरुणीने पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी तंजीर इनामदार याने तिला लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी नेले. तिथे तिला बळजबरीने दारू आणि सिगरेट पिण्यास भाग पाडले. पीडिता शुद्धीत नसताना तिचे वारंवार लैंगिक शोषण करण्यात आले.

Nashik Crime News: तुळशीमाळ अन् हातात बांधलेला दोरा काढला

तपासातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने पीडितेच्या धार्मिक ओळखीवर घाला घातला. तिच्या गळ्यातील तुळशीमाळ आणि हातावर बांधलेला धागा बळजबरीने तोडून टाकला. आरोपीने तिला एका विशिष्ट धर्माच्या रिवाजाप्रमाणे ‘गजवा-ए-हिंद’चे पालन करण्यास सांगून धर्मांतरासाठी प्रचंड दबाव टाकला.

Nashik Crime News: ब्लॅकमेलिंगचा ‘लव्ह बाईट’ पॅटर्न

जानेवारी 2026 मध्ये आरोपीने पीडितेच्या गळ्याजवळ चावा घेऊन हे ‘लव्ह बाईट’ असल्याचे सांगत तिचे आक्षेपार्ह फोटो मोबाईलमध्ये काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी देऊन त्याने तिला वारंवार लॉजवर नेले आणि बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.

Nashik Crime News: आणखी काही मुली जाळ्यात असण्याची शक्यता

संशयित तंजीर इनामदार याने अशाच पद्धतीने शहरातील आणखी काही मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. सध्या पोलिसांनी एकाच तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असला तरी, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, तंजीर इनामदार याला कोर्टात हजर करण्यात आले. त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Nashik Crime News: सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद

– तंजीर इनामदारच्या पोलिस कोठडीची मागणी
– महागड्या लॉजमध्ये पीडित तरुणीला न्यायचा
– दारू,सिगारेट वापरायचा
– TCS प्रमाणे हे प्रकरण आहे
– धर्मांतरण करण्यासाठी पीडित तरुणीला जबरदस्ती करायचा
– आणखी काही तरुणींना फसवले आहे का? याचा तपास करायचा आहे
– जोर जबरदस्ती केली आहे
– महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्याच्याकडे एवढा पैसे कुठून आला? त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का? त्याचा शोध घ्यायचा आहे,

Nashik Crime News: आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद

– दोघेही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत.
– जानेवारीत अत्याचार झाला तर तेव्हापासून आतापर्यंत वेळ का घालवला?
– फोटो दाखवून धमकीचा कोणताही पुरावा नाही
– दोघांचेही एकमेकांवर प्रेम
– घरच्यांनी विरोध केल्यामुळे आता हा आरोप होत आहे
– पोलिस कोठडीची गरज नाही
– सिगारेट पार्टीचा कोणताही पुरावा नाही

इतर महत्त्वाच्या बातम्या

Amravati Crime News: हाय हॅलो करत बसायचं नाही तर, एकच प्रश्न थेट विचारायचा अन्…; अमरावती व्हिडीओकांड प्रकरणातील मास्टमाईंड अयानला ‘लव्ह गुरु’च्या टिप्स

Nida Khan: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणातील ‘मास्टरमाइंड’ निदा खानची हकालपट्टी, नामांकित कंपनीचं ‘ते’ पत्र समोर, नेमकं काय म्हटलंय पत्रात?

आणखी वाचा

Comments are closed.