ज्याला पाहताच बॅट्समनची दातखिळी बसायची, तो ‘अफगाणी वाघ’ ICU मध्ये, मृत्यूशी झुंजतोय! कोण आहे हा

अफगाणिस्तानचा क्रिकेटर शापूर झद्रान भारतात रुग्णालयात दाखल अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज शापूर जादरान (Shapoor Zadran) याला गंभीर आजारामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले असून तो सध्या आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंजतोय. मिळालेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती अतिशय नाजूक आहे. पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमल याने रुग्णालयातील काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. तसेच शाहिद आफ्रिदी याने जादरानच्या भावाशी संवाद साधून त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

38 वर्षीय शपूर जादरानला गंभीर आजार झाल्यामुळे त्याला इंटेन्सिव्ह केअर युनिट (ICU) मध्ये ठेवण्यात आले आहे. तो सध्या डॉक्टरांच्या कडक देखरेखीखाली उपचार घेत आहे. उमर अकमलने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे काही फोटो शेअर केले असून ते पाहून क्रिकेटविश्वात चिंता व्यक्त केली जात आहे आणि सर्वजण त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.( Afghanistan Cricketer Shapoor Zadran Battling For Life admitted to ICU)

शाहिद आफ्रिदी याने व्यक्त केली चिंता

उमर अकमलने फोटो शेअर करत लिहिले की, “जादरान माझ्यासाठी मित्रासारखा आहे. तो लवकर बरा व्हावा हीच प्रार्थना.” तर शाहिद आफ्रिदी याने त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत सांगितले की त्यांनी त्याच्या भावाशी फोनवर बोलून परिस्थितीची माहिती घेतली.

आफ्रिदी म्हणाला, “आज शापूर जादरानच्या भावाशी फोनवर बोललो. त्याच्या प्रकृतीबद्दल ऐकून मन खूप व्यथित झाले. मैदानावर तू नेहमीच लढवय्या राहिलास, आणि मला खात्री आहे की या कठीण प्रसंगातूनही तू लढून बाहेर पडशील. तुझ्या लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.”

प्रकृती का नाजूक आहे?

माहितीनुसार जादरानच्या शरीरातील व्हाइट ब्लड सेल्सची संख्या खूप कमी झाली आहे, जी अत्यंत धोकादायक स्थिती मानली जाते. त्यामुळे सध्या चालू असलेला उपचाराचा कालावधी त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

शापूर जादरानची क्रिकेट कारकीर्द

शापूर जादरान एक वेगवान गोलंदाज होता, ज्याने आपल्या कारकिर्दीत अनेक महान फलंदाजांना बाद केले. तो जगातील प्रत्येक प्रमुख संघाविरुद्ध खेळला. 2009 ते 2019 दरम्यान, त्याने 44 एकदिवसीय आणि 36 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 43 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 37 बळी घेतले. याव्यतिरिक्त, शापूर जादरानने 83 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 90 विकेट्से घेतले.

हे ही वाचा –

पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! सरफराज अहमद आता संघाचा नवा कोच, बांगलादेशविरुद्ध मालिकेसाठी टीमची घोषणा, 4 नव्या शिलेदारांची एन्ट्री

आणखी वाचा

Comments are closed.