अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीत मोठी दरवाढ तरीही उत्साह कायम, वर्षभरात सोन्याने दिला
जळगाव : साडेतीन मुहूर्तापैकी एक प्रमुख मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयेचा मुहूर्त मानला जातो, या दिवशी केलेली सुवर्ण खरेदी ही शुभ असते, बरकत देणारी असते, अशी अनेकांची श्रद्धा असल्याने जळगावमधे हा मुहूर्त सोने (Gold Price Akshaya Tritiya)खरेदीचा मुहूर्त म्हणूनही मानला जातो. आजच्या या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर असलेल्या सुवर्ण खरेदीच्या मुहूर्ताचा अनेक जण लाभ घेत सोने खरेदी करतील. (Gold Price Akshaya Tritiya)
गेल्या काही वर्षात जागतिक पातळीवर होत असलेल्या घडामोडीचा परिणाम म्हणून सोने आणि चांदीच्या दरात दिवसागणिक मोठी वाढ होताना दिसत आहे, हे लक्षात आल्याने अनेक ग्राहकांनाचा कल आता सोने खरेदीकडे वाढू लागल्याने, कोणताही शुभ मुहूर्त आला तर जळगावमधे लोक सोने खरेदी करताना दिसू लागली आहे.(Gold Price Akshaya Tritiya)
सोने चांदी: मागील वर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीने किती परतावा दिला?
मागील वर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तब्बल दहा ग्राम सोन्याच्या मागे ५६००० हजार रुपयांचा परतावा मिळाला आहे, तर चांदीमधे ही विक्रमी असा १६०००० हजार रुपयांचा परतावा किलो मागे मिळाला आहे. जे सोन्याचे दर ९७००० हजार होते ते आज १५३००० हजार रुपये वर जाऊन पोहोचले आहेत. चांदीमधे ही मोठी वाढ होऊन १००००० रुपये किलो असलेली चांदी आज २६०००० हजार वर जाऊन पोहोचली असल्याने, मागील वर्षी सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा लाभ झाल्याने, यंदाही असाच परतावा मिळेल या आशेने अनेक ग्राहक अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून सोने चांदी खरेदी करताना पाहायला मिळत आहे.(Gold Price Akshaya Tritiya)
Gold Silver : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताना ‘या’ ५ चुका टाळा
अक्षय्य तृतीया म्हणजे सुख-समृद्धी आणि अक्षय फळ देणारा दिवस मानला जातो. उद्या (रविवार, १९ एप्रिल २०२६ रोजी) हा सण साजरा होत आहे. या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते, त्यामुळे सोने चांदी बाजारात मोठी गर्दी दिसून येते. मात्र, गर्दीच्या दिवशी, घाईघाईत किंवा भावनेच्या भरात सोने खरेदी करताना ग्राहकांकडून काही गंभीर चुका होतात. तुमचे कष्टाचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जावेत यासाठी या ५ गोष्टी लक्षात ठेवा.
तुम्ही भविष्यात गरजेला उपयोगी म्हणून सोने घेत असाल, तर मोठे दागिने घेणे टाळा. त्यापेक्क्षा २४ कॅरेटची सोन्याची नाणी, वेढे किंवा ‘सोव्हरन गोल्ड बाँड्स’ घ्या, गुंतवणूक म्हणून हा उत्तम पर्याय आहे.
नेहमी ‘बीएआयस हॉलमार्क’ असलेलेच दागिने खरेदी करा. दागिन्यांवर ‘एचयूआयडी’ क्रमांक असल्याची खात्री करा. यामुळे तुमच्या सोन्याची पूर्ण माहिती सरकारकडे नोंद होते. त्याचबरोबर घेताना कॅरेट देखील चेक करा.
अनेक ज्वेलर्स ‘झीरो मेकिंग चार्जेस’च्या किंवा इतके-इतके टक्के मजुरीवर सुट अशा जाहिराती करतात. अशा वेळी सोन्याचा प्रति ग्रॅम दर तपासा किंवा ‘वेस्टेज चार्जेस’ (तूट) जास्त लावले जात नाहीत ना याची खात्री करा.
सोने परत विकताना वा बदलून घेताना किती पैसे कमी होतील, हे विचारून घ्या. नामांकित ज्वेलर्स त्यांच्याकडून घेतलेल्या सोन्यावर चांगला परतावा देतात.
अक्षय्य तृतीया आहे म्हणून जास्तीत जास्त सोने खरेदी करू नका. तज्ज्ञांच्या मते, तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या केवळ १० ते १५ टक्के रक्कम सोन्यात असावी.
आणखी वाचा
Comments are closed.