नवा राजा, नवा रुबाब! श्रेयससमोर ऋषभ पंतची शरणागती, पंजाबचा विजयरथ सुसाट, तर लखनऊच्या पराभवाची ह

पंजाब किंग्जने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्सचा विजयरथ रोखणे सध्या तरी कोणत्याही संघाला शक्य होताना दिसत नाहीये. रविवारी झालेल्या 28 व्या सामन्यात पंजाब किंग्सने ऋषभ पंतच्या लखनऊ सुपर जायंट्सचा 54 धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयासह श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबने सलग पाचवा विजय नोंदवून गुणतालिकेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, त्याने  प्लेऑफच्या दिशेने दमदार पाऊल टाकले. तर लखनऊला सलग तिसऱ्या पराभवाचा धक्का बसला आहे.

प्रियांश-कूपरची फटकेबाजी आणि धावांचा डोंगर

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब किंग्सची सुरुवात वादळी झाली. प्रियांश आर्य आणि कूपर कॉनोली या जोडीने लखनऊच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच हल्ला चढवला. या दोघांनी मैदानावर जणू काही धावांचे तांडवच घातला. दोघांनी मिळून अवघ्या 80 चेंडूंमध्ये 182 धावांची भागीदारी केली.

प्रियांश आणि कॉनोली यांनी मिळून अवघ्या 83 चेंडूंमध्ये 180 धावा केल्या. दोघांनी मिळून 16 षटकार आणि 12 चौकार मारले. त्यांच्या धमाकेदार अर्धशतकी खेळींच्या जोरावर पंजाबने निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 254 धावांचा डोंगर उभा केला. या हंगामातील पंजाबची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली असून, लखनऊच्या गोलंदाजीचे वाभाडे काढण्यात पंजाबचे फलंदाज यशस्वी झाले.

ऋषभ पंत अन् मिचेल मार्श एकटे पडले…

255 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात अत्यंत अडखळत झाली. सुरुवातीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने 43 धावा करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, तर मिचेल मार्शने 40 धावांची खेळी केली. मात्र, धावगती वाढवण्याच्या नादात लखनऊने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. 20 ओव्हर्सअखेर लखनऊला 5 गडी गमावून केवळ 200 धावांपर्यंतच मजल मारता आली.

पंजाबच्या विजयात गोलंदाजांनीही मोलाची भूमिका बजावली. मार्को जॅनसेनने घातक मारा करत लखनऊचे 2 महत्त्वाचे बळी घेतले. त्याला अर्शदीप सिंग, अनुभवी युझवेंद्र चहल आणि विजयकुमार वैशाख यांनी प्रत्येकी 1 बळी घेत उत्तम साथ दिली. पंजाबच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे लखनऊचे फलंदाज हतबल दिसले.

गुणतालिकेत पंजाबचा दबदबा

या दिमाखदार विजयामुळे पंजाब किंग्सने यंदाच्या मोसमातील प्लेऑफच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकले आहे. पंजाबने आतापर्यंत 6 सामने खेळले असून त्यापैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. 11 गुणांसह श्रेयस अय्यरचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.

दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्ससाठी आता पुढचा रस्ता अत्यंत कठीण झाला आहे. 6 सामन्यांपैकी केवळ 2 सामन्यांत त्यांना विजय मिळवता आला असून, 4 गुणांसह ते आठव्या स्थानावर आहेत.

हे ही वाचा –

PBKS vs LSG IPL 2026 : 6,6,6,6,6… पंजाबच्या कॉनोली अन् आर्याचा ‘पॉवर शो’, मार्करमची पिसं काढली! एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार; मैदानात नुसता राडा

आणखी वाचा

Comments are closed.