वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू; उमरी तालुक्यातील हुंडा तांडा येथील घटना
उमरी तालुक्यातील हुंडा तांडा परिसरात 19 एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली, ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. यात हुंडा तांडा येथील रहिवासी असलेले, पांडुरंग संगू राठोड यांच्या शेत सर्वे नंबर 22 मधील शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या बैलाच्या जोडीवर अचानक वीज कोसळली. या घटनेत दोन्ही बैल जागीच मरण पावले. याची माहिती कळताच गावातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. या बैलांची किंमत सुमारे एक लाख साठ हजार इतकी होती.
Comments are closed.