एमसीए चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 ला सुरुवात, 8 संघांमध्ये विजेतेपदासाठी चूरस

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे सोमवारी बीकेसी मैदानावर एमसीए चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 चे शानदार उद्घाटन करण्यात आले. आगामी टी-20 मुंबई लीगसाठी खेळाडूंना सराव आणि व्यासपीठ मिळवून देणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, हिंदुस्थानची माजी कर्णधार डायना एडुलजी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ही स्पर्धा 20 एप्रिल ते 30 एप्रिल २2026 दरम्यान खेळवली जाईल. टी-20 मुंबई लीगसाठी नोंदणी केलेल्या खेळाडूंमधून निवडलेले 8 संघ यात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे सामने बीकेसी, कांदिवली (सचिन तेंडुलकर जिमखाना), ठाणे (दादोजी कोंडदेव स्टेडियम) आणि महालक्ष्मी (वेस्टर्न रेल्वे) येथे होतील.

Comments are closed.