आमदार महेश शिंदेंना धक्का,कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
सातारा : शिवसेनेच्या सातारा जिल्ह्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक यांचा भव्य सत्कार आणि जाहीर सभा साताऱ्यातील गांधी मैदानावर पार पडली. ही सभा सुरु होण्यापूर्वीच राज्यभर चर्चेत आली. कारण, शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचे फोटो सभेनिमित्त शहरभरात लावण्यात आलेल्या बॅनरवर फोटो नव्हते. या सर्व प्रकरणानंतर आमदार महेश शिंदे यांनी गांधी मैदानावरील सभेला उपस्थित राहणार नसल्याचं म्हटलं होतं. याच महेश शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे निकटवर्तीय कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गेंनी त्यांची साथ सोडली आहे. भाजपमधून राजाभाऊ बर्गे शिवसेनेत दाखल झाले आहेत.
राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत, महेश शिंदेंना धक्का
आमदार महेश शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. महेश शिंदे यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गेनी महेश शिंदे यांची साथ सोडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजाभाऊ बर्गे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज जिल्ह्यातील अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश झाले. यामध्ये आमदार महेश शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी भाजपची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आमदार महेश शिंदे यांना हा खूप मोठा झटका मानला जातोय.
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानं शिवसेनेतून लढलो
आमदार महेश शिंदे यांनी सकाळी त्यांची भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले होते की साताऱ्यात होणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचा निमंत्रण मला नाही त्यामुळे मी या कार्यक्रमाला येणार नाही.मी स्वतःच्या जीवावर निवडून आलो आहे. पालकमंत्री शंभूराजे देसाई हे मला पहिल्यापासून वेगळी वागणूक देतात. कोणत्याही कार्यक्रमांना मला बोलावलं जात नाही. कोरेगाव मध्ये शिवसेना आणि भाजपची युती होती. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मला शिवसेनेच्या चिन्हावर लढायला सांगितले त्यामुळे मी शिवसेनेतून लढलो होतो.
शंभूराज देसाई काय म्हणाले?
महेश शिंदे यांच्या भूमिकेसंदर्भात विचारलं असता, शंभूराज देसाई म्हणाले की शिवसेना शिस्तबद्ध चालणारा पक्ष आहे .. पक्षाचे मुख्य नेते जिल्हा येतात तेव्हा कोणत्याही नेत्याला निमंत्रण देण्याची पद्धत नाही.. कार्यक्रम ठरल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कार्यक्रमाला येण्याची पद्धत आहे. काही बॅनरवर आमदार महेश शिंदे यांचे फोटो नाहीत हे वस्तुस्थिती आहे.आमदार महेश शिंदे यांना कार्यक्रमाची कल्पना देण्याचे आदेश जिल्हाप्रमुखांना दिले आहेत.आमदार महेश शिंदे यांना कल्पना कार्यक्रमाची आहे.
आणखी वाचा
Comments are closed.