शरद पवार ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नियमित तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असून सध्या त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना दिली.

पुण्यात माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. चिंतेचे कोणतेही गंभीर कारण नसून ही केवळ एक नियमित तपासणी आहे. काही आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. तपासणीचे अहवाल आल्यानंतरच पुढील स्थिती स्पष्ट होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. 23 तारखेला या जागेसाठी मतदान होणार असून आज प्रचाराची सांगता सभा होती. या सभेला शपद पवार उपस्थित राहणार की नाही, याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली.

Comments are closed.