Jay Pawar speech Baramati : दादांचा लाडका जयड्या भरभरुन बोलला, बारामतीतील पहिलं भाषण
जय पवार: दररोज रात्री आमचे दौरे संपायचे तेव्हा दादांचा मला फोन यायचा, “काय रे जय, कसा दौरा झाला”, असे म्हणणारा आवाज आता नाही. आजही मला तोच आवाज ऐकू येतोय, दादा एकदम ठामपणाने बोलायचे, ‘जयड्या रडायचं नाही, लढायचं’, असे भावनिक भाषण अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र जय पवार (Jay Pawar) यांनी केले. बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठीची सांगता सभा पार पडली. या सभेतून जय पवार बोलत होते.
जय पवार म्हणाले की, शेवटची सांगता सभा झाली तेव्हा अजितदादांच्या समोर भाषण केले होते. सांगता सभेत पहिले भाषण केले. ते त्यांच्यासमोरील शेवटच ठरलं. आता ही निवडणूक आम्ही हातात घेतली आहे. हा प्रचार नाही तर मी माझ्या बारामतीच्या कुटुंबाला भेटत आहे. त्यांच्या अडचणी ऐकून घेत आहे. अजित दादांच्या वेळी प्रचार करायला मला आवडायचं. पाच वर्षांनी प्रचार असायचा. रॅली काढायचो. पण यावेळी मला दादांचा आवाज आठवतोय. दररोज रात्री आमचे दौरे संपायचे तेव्हा दादांचा मला फोन यायचा, “काय रे जय, कसा दौरा झाला”, असे म्हणणारा आवाज आता नाही.
Comments are closed.