केरळमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 13 ठार

त्रिशूर येथे भीषण दुर्घटना : पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त

वृत्तसंस्था/ त्रिशूर

केरळच्या त्रिशूर जिल्ह्याच्या मुंडथिक्कोडु भागात मंगळवारी एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण विस्फोट झाला आहे. या विस्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. त्रिशूर शहरात होणाऱ्या वार्षिक मंदिर उत्सव पूरमची तयारी सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे.

विस्फोटावेळी युनिटमध्ये सुमारे 40 जण काम करत होते. 7 जण या दुर्घटनेतून बचावले असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्रिशूर पूरमच्या थिरुवंबाडी गटासाठी आतषबाजीचे नमुने तयार केले जात असताना कारखान्यात हा विस्फोट झाला.

घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात विस्फोटक सामग्री ठेवण्यात आली होती, ज्याला आग लागल्यावर मोठे विस्फोट झाले. प्रारंभिक माहितीत जवळपास 40 जण जखमी झाल्याची बाब समोर आली होती, ज्यातील कमीतकमी 8 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले होते. तर दुर्घटनेनंतर प्रशासनाने त्रिशूर मेडिकल कॉलेजसमवेत आसपासच्या रुग्णालयांना अलर्टवर राहण्याचा निर्देश दिला.

विस्फोटाचा मोठा आवाज

विस्फोटानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धूर अन् आग फैलावल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. घटनास्थळी अर्धवट जळालेल्या विस्फोटकांमुळे बचावकार्य प्रभावित झाले. पोलीस आणि आपत्कालीन सेवांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचत स्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु विस्फोट इतका शक्तिशाली होता की याचा आवाज अनेक किलोमीटर अंतरावरही ऐकू आला.

 

 

Comments are closed.