भारतीय रेल्वे: दिव्यांगांसाठी राखीव डब्याबाबत रेल्वे विभागाचा मोठा निर्णय

भारतीय रेल्वे | आपल्या भारतातील रेल्वेचे जाळे खूप विस्तृत आहे. देशात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात कारण रेल्वे प्रवास खूप स्वस्त आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उत्तम आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण लगेच ट्रेनमध्ये बसू शकतात. रेल्वेने प्रवास करताना अनेकदा सामान्य प्रवासीही दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये बसल्याचे दिसून येते. मात्र आता हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. याबाबत स्पष्ट आणि कडक भूमिका घेत रेल्वे बोर्डाने नियम जाहीर केले आहेत.
ट्रेनच्या पुढील आणि मागील बाजूस SLRD आणि LSLRD डबे विशेषतः अपंग प्रवाशांसाठी राखीव आहेत. या डब्यांचा वापर कोण करू शकतो याबाबत रेल्वेने आता स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. भारतीय रेल्वे
रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार, UDID कार्ड (युनिक डिसॅबिलिटी आयडी) असलेले दिव्यांग नागरिक या डब्यांमधून प्रवास करू शकतात. तसेच, ज्या दिव्यांग प्रवाशांना रेल्वेने सवलतीचे भाडे मंजूर केले आहे, त्यांनाही या डब्यांमधून प्रवास करण्याचा अधिकार आहे.
“बोनाफाईड पॅसेंजर” कोणाला म्हणायचे हे देखील रेल्वेने स्पष्ट केले आहे. वैध UDID कार्ड असलेले आणि सवलतीच्या भाड्यासाठी पात्र असलेले दिव्यांग प्रवासीच या डब्यांमधून प्रवास करू शकतात. मात्र, केवळ कार्ड असणे पुरेसे नाही. त्यांच्याकडे रेल्वेचे वैध तिकीट असणे आवश्यक आहे.
दरम्यान, दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या या डब्यांमध्ये इतर प्रवाशांनी प्रवेश केल्याची प्रकरणे वारंवार समोर आली होती. त्यामुळे खऱ्या गरजूंना त्रास सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर रेल्वेने कडक भूमिका घेतली आहे. भारतीय रेल्वे
आता विनापरवानगी या डब्यांमधून प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे कायदा १९८९ अंतर्गत थेट कारवाई करण्यात येणार आहे. यात दंड आणि इतर कायदेशीर कारवाईचा समावेश असू शकतो. दिव्यांग प्रवाशांना सुरक्षित आणि सन्मानाने प्रवास करता यावा यासाठी हे नियम कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाने नियमांचे पालन करणे आणि योग्य जागेचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.
Comments are closed.