इथून चालते व्हा, तुमचं काय चाललंय…काल महिला संतापली; आज गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, म्
गिरीश महाजन संतप्त महिलांवर लोकसभेत महिला आरक्षण (Women Reservation Bill) घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर काल मुंबईत भाजपकडून विरोधी पक्षांविरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वरळीच्या जांबोरी मैदान ते एनएससीआय डोमपर्यंत हा भाजपचा जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र या जनआक्रोश मोर्चामुळं जांबोरी मैदान परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीच्या त्रासामुळं संतप्त झालेल्या महिलेच्या रागाचा सामना मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना करावा लागला. सदर महिलेनं गिरीश महाजनांवर प्रश्नांचा भडिमार केला. या दरम्यानचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Mumbai Women Angry Girish Mahajan)
सदर महिलेने गिरीश महाजनांसमोर संताप व्यक्त केला. तुमचं हे काय चाललंय?, इथून चालते व्हा…शेकडो लोक आपल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. विरोध करायचाच तर तो मैदानात करा, वाहतूक कोंडी का करत आहात?, असा सवालही महिलने उपस्थित केला. संतापलेल्या महिलेने उपस्थित असणाऱ्या पोलिसांना देखील सवाल केला. इतकी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असताना तुम्ही बघ्याची भूमिका का घेत आहात?, असा प्रश्न महिलेने पोलिसांना विचारला.
सदर घटनेनंतर गिरीश महाजन काय म्हणाले? (Girish Mahajan On Angry Women)
मुंबईत काल घडलेल्या घटनेनंतर आज माध्यमांशी गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला. यावर वाहतूक कोडींमुळे त्या महिला वैतागलेल्या होत्या. मोर्च्यामुळे थोड्या फार प्रमाणात वाहतूक कोंडी आणि सामान्यांना गैरसोय होत असते. मात्र त्यावेळी एक भगिनी महिला तिथे अत्यंत वाट्टेल तशा भाषेत बोलत होत्या. त्या महिला पोलीस भगिनींसोबतही अत्यंत वाईट भाषेत बोलत होत्या. मी त्यांना समजावत होतो की आम्ही 10-15 मिनिटांत निघून जाऊ, असं गिरीश महाजन यांनी सांगितले. त्या महिलेने बाटली फेकून मारली, ज्या भाषेचा वापर केला ते चुकीचं होतं, असं गिरीश महाजन म्हणाले. तसेच पुढच्या वेळी यासंदर्भात आम्ही काळजी घेऊ की कुणाला अशी गैरसोय होणार नाही, असंही गिरीश महाजनांनी सांगितले.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.