लखनऊ सुपर जायंट्सचे 50 कोटी वाया जाणार? स्वतःला सिद्ध करण्यासाठी 'या' 2 खेळाडूंवर प्रचंड दडपण
आयपीएल (IPL) 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सची (LSG) सुरुवात अपेक्षेप्रमाणे झालेली नाही आणि आता संघातील सर्वात महागडे खेळाडू ऋषभ पंत (Rishbh pant & Nicolas Pooran) आणि निकोलस पूरन यांच्यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. लखनऊने या दोघांना सुमारे 50 कोटी रुपयांच्या संयुक्त किमतीत संघात सामील केले होते. या जोडीकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु आतापर्यंत त्यांची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. लखनऊने 6 सामन्यांत केवळ दोन विजय मिळवले असून पॉइंट्स टेबलमध्ये संघ 9 व्या क्रमांकावर आहे. फलंदाजीतील सातत्याचा अभाव स्पष्टपणे दिसून आला आहे, तर टॉप ऑर्डरमध्ये सतत होणारे बदलही संघासाठी नुकसानकारक ठरले आहेत. सर्वात मोठी चिंता पंत आणि पूरन यांचा खराब फॉर्म ही आहे.
ऋषभ पंतने 6 सामन्यांत 147 धावा केल्या आहेत, त्याची सरासरी 29.40 आणि स्ट्राइक रेट 136.11 आहे. त्याची एकमेव मोठी खेळी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाबाद 68 धावांची राहिली, ज्यामुळे संघाला विजय मिळाला होता. दुसरीकडे, पूरनची कामगिरी अधिक चिंताजनक आहे. त्याने 6 डावात केवळ 51 धावा केल्या आहेत, त्याची सरासरी 8.50 आणि स्ट्राइक रेट 79.68 राहिला आहे.
न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू सायमन डूल यांनीही या मुद्द्यावर उघडपणे भाष्य केले. त्यांनी संघातील परदेशी खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सायमन डूल यांनी ‘क्रिकबझ’शी बोलताना सांगितले की, त्यांची सर्वात मोठी समस्या तीन परदेशी खेळाडू आहेत. तुमच्या टॉप-5 फलंदाजांमध्ये तीन परदेशी फलंदाज आहेत. त्यापैकी एडन मार्करमने काही चांगल्या खेळी खेळल्या आहेत. मिचेल मार्शने काही खास केलेले नाही आणि पूरनने तर काहीच केलेले नाही. हीच तुमची सर्वात मोठी समस्या आहे.
ते पुढे म्हणाले की, पंतने आपल्या फलंदाजीने त्यांना फक्त एक सामना जिंकून दिला आहे, त्याव्यतिरिक्त काहीही नाही. तुम्ही पंत आणि पूरन या दोन खेळाडूंवर जवळपास 50 कोटी रुपये खर्च केले आहेत, ज्यांनी तुम्हाला केवळ एक सामना जिंकून दिला आहे. म्हणजेच, तुम्ही तुमच्या एकूण बजेटचा अर्धा भाग अशा दोन खेळाडूंवर खर्च केला आहे, ज्यांनी तुम्हाला फक्त एक सामना जिंकून दिला.
आता लखनऊचा पुढचा सामना आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध आहे, जो संघाच्या या सीझनची दिशा ठरवू शकतो. या महत्त्वाच्या सामन्यात पुन्हा एकदा पंत आणि पूरन यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील. या सामन्यात पंत आणि पूरन यांच्या बॅटमधून किती धावा निघतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Comments are closed.