सार्वजनिक शौचालय वापरताना घ्या खबरदारी

ऑफिस किंवा प्रवासात, कार्यक्रमात आपण सार्वजनिक शौचालयाचा वापर करतो. पण बऱ्याचवेळा त्यानंतर अनेकांना युरिनरी इन्फेक्शन, स्कीन इन्फेक्शनचा त्रास जाणवू लागतो. यामुळे जर तुम्हालाही सतत प्रवास करावा लागत असेल किंवा ऑफिसमध्ये सार्वाजनिक शौचालयाचा वापर करावा लागत असेल तर योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी काय करावे ते बघूया.

शौचालय वापरण्यापूर्वी आणि नंतर साबणाने किमान 20 सेकंद हात धुवावेत.

जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर शक्य असल्यास टॉयलेट सीट कव्हर वापरा किंवा टिश्यू पेपर अंथरून बसा.कारण या दोन्ही गोष्टी कॅरी करणे सोपे आहे.

नेहमी कमोडचे झाकण बंद करावे आणि त्यानंतरच फ्लश करावे. त्यामुळे जंतू पसरत नाहीत.

काहीवेळा शौचालयात टिश्यू किंवा साबण उपलब्ध नसतो, म्हणून या दोन्ही गोष्टी स्वत:जवळ ठेवा.

दरवाज्याचे हँडल, नळ इ. वस्तूंना थेट हात लावणे टाळा किंवा नंतर लगेच सॅनिटायझर वापरा.

शक्य असल्यास वापरण्यापूर्वी सीट आणि आसपासचा भाग पाण्याने स्वच्छ करा.

शौचालयात कधीही अनवाणी जाऊ नका. चप्पल घालून जावे.

शौचालयात गेल्यावर मोबाईल, पर्स इ. वस्तू स्वच्छ आणि कोरड्या ठिकाणी ठेवाव्यात.

लहान मुलांना शौचालय वापरताना मदत करा आणि त्यांच्या हातांची स्वच्छता करा.

टिश्यू, सॅनिटरी नॅपकिन इ. वस्तू कचरापेटीत टाका, कमोडमध्ये नाही.

ही साधी काळजी घेतल्यास आपण संसर्ग टाळू शकतो आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यास मदत करू शकतो.

Comments are closed.