सरकारी कर्मचाऱ्यांना संदेश: 'नागरिक हा देव आहे'
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पत्र : लोकसेवकांना ‘कर्मयोगी’ अशी उपमा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या एक कोटीहून अधिक लोकसेवकांना पत्र लिहिले आहे. ‘नागरिक देवो भव’ (नागरिकच देव आहेत) हा सिद्धांत प्रत्येक निर्णयाचा मूलमंत्र असायला हवा आणि सरकारने स्वत:च्या क्षमतेनुसार जनतेची सेवा करावी असे पंतप्रधानांनी पत्राद्वारे सांगितले आहे.
शासन करुणेवर आधारित असायला हवे आणि सार्वजनिक सेवेची जबाबदारी निभावणाऱ्यांनी आजीवन शिकत राहत एक सर्वोत्तम उदाहरण ठरावे असा संदेश मोदींनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिला आहे. पंतप्रधान मोदींचे हे पत्र हिंदी, इंग्रजी, मराठी, ओडिया, गुजराती, बांग्ला, कन्नड, पंजाबी, आसामी, मल्याळी, तेलगू आणि तमिळ भाषेत जारी करण्यात आले आहे.
21 वे शतक मोठ्या आव्हानांसोबत संधींचाही काळ आहे आणि कल दिवसेंदिवस बदलत आहेत, नवे तंत्रज्ञान समोर येत असून सातत्याने नवोन्मेष होत आहेत. नागरिक आणि जग दोघांनाही देशाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सरकारच्या सेवा आणि कार्यसंस्कृती या ऐतिहासिक युगाचा कमाल लाभ उचलण्यासाठी अनुकूल असाव्यात. या दिशेने ‘आयगॉट कर्मयोगी’ यासारख्या मंचांच्या वापराद्वारे शिकण्याला आजीवन सवय करणे महत्त्वपूर्ण असल्याचे मोदींनी पत्रात नमूद केले आहे.
पंतप्रधानांनी लोकसेवकांना ‘कर्मयोगी’ संबोधून हे पत्र अत्यंत विशेष समयी लिहिले आहे. रोंगाली बिहू, विशु, पुथंडू, पोइला बोइशाख, महा बिशुबा पाना संक्रांती आणि बैसाखीयच उत्साहाने पूर्ण वातावरण भारावून गेले आहे. हे सण आशा आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहेत. अशासमयी लोकसेवक शिकणे आणि विकासाच्या एका उत्सव ‘साधना सप्ताहा’चे हिस्सा ठरले आहेत. भारताच्या कानाकोपऱ्यातील लोकसेवकांना एकत्र आणणाऱ्या या अनोख्या प्रयोगाचा हिस्सा होण्यासाठी शुभेच्छा देत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
आयगॉट कर्मयोगी
पंतप्रधान मोदीनी देशभरातील कर्मचाऱ्यांना आयगॉट कर्मयोगी यासारख्या व्यासपीठांचा भरपूर वापर करण्याचा संदेश दिला आहे. या प्लॅटफॉर्मवर शासकीय कर्मचाऱ्यांना एआयसारख्या नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जात आहे. याचबरोबर याच्या माध्यमातून आवश्यक अहवाल कशाप्रकारे तयार केले जाऊ शकतात हे शिकविण्यात येत आहे. यावर अनेक कोर्स असून ते कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य करण्यात आले आहेत.
Comments are closed.