आंध्र प्रदेशात कार साइनबोर्डवर आदळली.

विशाखापट्टणम

आंध्रप्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्याच्या वीरवल्ली टोलनाक्यानजीक बुधवारी पहाटे भीषण रस्ते दुर्घटना घडली आहे. एक भरधाव कार साइन बोर्डाला जाऊन धडकली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रारंभिक तपासात दुर्घटनेचे कारण भरधाव वेग असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत.

Comments are closed.