बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार किती मतांनी विजयी होणार? रोहित पवारांनी थेट आकडाच सांगितला;

सुनेत्रा पवारांवर रोहित पवार : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Baramati By Election 2026) आज मतदान पार पडत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या निवडणुकीच्या रिंगणात असून या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Sunetra Pawar) यांनी पिंपळी या गावात बारामती पोटनिवडणुकीसाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या किती मतांनी निवडून येतील? याबाबत थेट आकडाच सांगितला आहे.

रोहित पवार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, अजितदादांच्या प्रति मनात जो आदर आहे, प्रेम आहे, त्या गोष्टींकडे पाहून मोठ्या बहुसंख्येने आपण मतदानाला आले पाहिजे. मला विश्वास आहे की, बारामतीकर नक्कीच मतदानाला येतील. काही ठिकाणी आम्हाला कळाले आहे की, लोकांची नावे ज्या बुथवर पाहिजे त्या ठिकाणी न येता लांबच्या बुथवर आलेली आहेत. मला लोकांना सांगायचे आहे की, दादांचे कार्यकर्ते आपल्या सेवेसाठी त्या प्रभागात असतील. त्यांना तुम्ही भेटा आणि तुमचे नाव कुठे आले आहे ते जाणून घ्या. बूथ लांब असले तरी मतदान करा आणि सुनेत्रा काकींना खूप चांगल्या मतांनी तुम्ही निवडून द्या, असे त्यांनी म्हटले.

Rohit Pawar on Ajit Pawar: अजितदादा मनातून एकदम मवाळ होते

अजितदादांच्या आठवणीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, अजित दादा आणि शरद पवार यांचा आम्ही लहान असल्यापासून प्रचार करायचो. कधीकधी मी सायकल रॅलीमध्ये सुद्धा सहभाग घेतला आहे. लहान असताना मी तिथे भाषण करत नव्हतो. परंतु, आई-वडिलांसोबत जिथे जाता येईल तिथे जात होतो आणि प्रचार करत होतो. अजितदादा तसे बोलायला कडक होते. पण, मनातून एकदम मवाळ होते. नेहमीच ते मला म्हणायचे काय चिरंजीव काय चालले आहे, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

Rohit Pawar on Sunetra Pawar: सुनेत्रा काकी अडीच लाख मतांनी निवडून येतील

रोहित पवार 2029 साली बारामतीतून निवडणूक लढणार का? असे विचारले असता मी कर्जत जामखेडमधून 2019 साली लढलो. 2024 साली देखील तिथूनच लढलो. तिथे वेगळ्या पद्धतीचा दबाव आहे. रोहित पवार परत विधिमंडळात येऊ नये यासाठी आर्थिक ताकद 2024 साली देखील लावली गेली. आता पण त्या बाबतीत तयारी सुरू आहे. पण, मी तिसऱ्यांदा सुद्धा कर्जत जामखेडमधूनच निवडणूक लागणार असल्याचे स्पष्टीकरण रोहित पवार यांनी दिले. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या किती मतांनी निवडून येतील? याबाबत विचारले असता मला विश्वास आहे की, बारामतीचे लोक सुनेत्रा काकींना अडीच लाख मतांनी निवडून देतील, असा आकडाच त्यांनी सांगितला.

आणखी वाचा

Rohit Pawar and Jay Pawar: बारामतीत 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते, जय पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची सूचक प्रतिक्रिया

आणखी वाचा

Comments are closed.