बुलढाणा बदनाम करण्याचा विडाच गायकवाडांनी उचललाय; कँटीनमध्ये हाणामारी, पोलिसाकडून गाडी धुणं अन्
मुंबई : दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी तब्बल 37 वर्षांपूर्वी लिहलेल्या ‘शिवाजी कोण होता’, या पुस्तकाच्या शीर्षकाबाबत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी प्रकाशकाला धमकी दिली. त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी (Prashant Ambi) यांना फोन करुन शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) अनादर केल्याचे म्हणत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली. संजय गायकवाड यांच्या फोनवरील शिवराळ संभाषणाची ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (Maharashtra Politics news) अरे गोविंद पानसरे (Govind Pansare) हा छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरीत शिवाजी म्हणणारा कोण होता? मला हे पुस्तक वाचायची गरज नाही. तुमच्यासारखे नालायक लोक शिवाजी महाराजांना एकेरी भाषेत बोलतात. तुला माहितीये ना, त्या गोविंद पानसरेचं काय झालं, त्याची अवस्था काय झाली? मी तुलाही घरात घुसून मारेन, तुला चिरडून टाकेन, तुझी जीभ छाटेन, अशी धमकी संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना दिली. या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत हल्लाबोल केला आहे.
गायकवाडांच्या धमकी प्रकरणावर पोस्ट करत हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं की, बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचा विडाच आमदार संजय गायकवाड या व्यक्तीने उचललाय. मग ते आमदार निवासातील कँटीन मधे हाणामारी करणे असो, सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांना स्वतःची गाडी धुवायला सांगणे असो की आता प्रशांत आंबी यांना धमकी असो. राज्यातील एक लोकप्रतिनिधी, सत्ताधारी पक्षातील आमदार, शिवरायांचा वंशज म्हणवून घेणाऱ्या या व्यक्तीची भाषा आणि शिव्यांची पातळी बघीतली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही यांच्या ओठावर असू नये, कारण ती लायकी यांची नाही. महाराजांनी या भूमीला घालून दिलेले संस्कार भ्रष्ट करण्याचे, महाराष्ट्राची संस्कृती नासवण्याचे, महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुसण्याचे काम यांच्यासारख्या विकृत व्यक्तींमुळे होते आहे, असंही पुढे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.
Harshwardhan Sapkal : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पोस्ट
“बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचा विडाच आमदार संजय गायकवाड या व्यक्तीने उचललाय. मग ते आमदार निवासातील कँटीन मधे हाणामारी करणे असो, सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांना स्वतःची गाडी धुवायला सांगणे असो की आता प्रशांत आंबी यांना धमकी असो.”
“राज्यातील एक लोकप्रतिनिधी, सत्ताधारी पक्षातील आमदार, शिवरायांचा वंशज म्हणवून घेणाऱ्या या व्यक्तीची भाषा आणि शिव्यांची पातळी बघीतली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही यांच्या ओठावर असू नये, कारण ती लायकी यांची नाही. महाराजांनी या भूमीला घालून दिलेले संस्कार भ्रष्ट करण्याचे, महाराष्ट्राची संस्कृती नासवण्याचे, महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुसण्याचे काम यांच्यासारख्या विकृत व्यक्तींमुळे होते आहे.”
“पुरोगामी कार्यकर्ते प्रशांत आंबी यांना धमकी देताना ‘पानसरे चे जे हाल केले, ते करण्याची’ म्हणजे थेट खुनाची धमकी देण्यात आली आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांना राज्य सरकारने तातडीने सुरक्षा द्यावी. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येत या आमदाराचा देखील सहभाग आहे का, याची चौकशी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या या व्यक्तीवर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.”
बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचा विडाच आमदार संजय गायकवाड या व्यक्तीने उचललाय. मग ते आमदार निवासातील कँटीन मधे हाणामारी करणे असो, सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांना स्वतःची गाडी धुवायला सांगणे असो की आता प्रशांत आंबी यांना धमकी असो.
राज्यातील एक लोकप्रतिनिधी, सत्ताधारी पक्षातील… pic.twitter.com/rxRjBX2coa
— हर्षवर्धन सपकाळ (@INCHarshsapkal) 23 एप्रिल 2026
आणखी वाचा
Comments are closed.