जळगावात भीषण अपघात, दुचाकीचं नियंत्रण सुटून ट्रॅक्टरला जोरदार धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू, पण
जळगाव अपघाताच्या बातम्या : जळगाव-जामनेर महामार्गावर (Jalgaon Jamner Highway) तोरणाळा येथील स्मशानभूमी जवळ एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात (Jalgaon Accident News) घडला आहे. दुचाकी आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या या भीषण धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मात्र, या भीषण अपघातात त्यांच्या सोबत असलेली केवळ एक वर्षाची चिमुकली मुलगी चमत्कारिकरित्या बचावली आहे.
Jalgaon Accident News: नेमकी घटना काय?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल वासुदेव खडके (वय 50) आणि सोनाली गोपाल खडके (वय 45, रा. सातबारा) हे आपल्या दुचाकीने घरी परतत होते. जामनेर महामार्गावरील तोरणाळा गावाजवळील स्मशानभूमीजवळ आले असताना, वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटले. परिणामी, समोरून चाललेल्या एका ट्रॅक्टरला दुचाकीने मागून जोरदार धडक दिली.
Jalgaon Accident News: पती-पत्नी जागीच ठार
हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसल्यानंतर गोपाळ खडके आणि सोनाली खडके हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्यामुळे या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या सोबत असलेली त्यांची एक वर्षाची लहान मुलगी देखील होती. मात्र, निसर्गाचा चमत्कार म्हणावा की दैव बलवत्तर, इतक्या भीषण अपघातात या चिमुकलीचे प्राण सुदैवाने वाचले आहेत.
Jalgaon Accident News: परिसरात हळहळ
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी आणि प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जामनेर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.