गुरुपुष्यामृत मुहूर्तावर आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात घसरण, चांदीचा भाव 5000 रुपयांनी पडला
सोन्याचांदीचा आजचा दर: इराण- इस्रायल, अमेरिकेच्या तणावामुळे गेल्या महिन्याभरापासून सोन्याचांदीच्या भावात चढ उतार होताना दिसतेय. काल (22 एप्रिल) देशांतर्गत बाजारात सोन्या चांदीच्या दारात सुमारे 1500 रुपयांची वाढ दिसून आल्यानंतर आता गुरुपुष्यामृत मुहूर्तावर ग्राहकांना आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दारात घसरण झाली असून चांदीचे भावही 5 हजार रुपयांनी पडले आहेत. त्यामुळे ग्राहकांना सोने चांदीच्या खरेदीसाठी अनुकूल दिवस मानला जातोय. (Gold Silver Prices Today)
सोन्याच्या दरात घसरण, चांदीचा भाव 5000 रुपयांनी पडला
गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानला जातो. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते, तेव्हा हा योग जुळून येतो. हा योग नवीन कामाची सुरुवात, गुंतवणूक आणि खरेदीसाठी सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. दरम्यान, आज गुरुपुष्यामृत मुहूर्तावर जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1200 रुपयांची तर चांदी दरात 5000 हजार रुपयांची घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
काल बाजार पेठ बंद असताना जीएसटीशिवाय असलेले 152200 रुपये सोन्याचे दर आज 151000 वर खाली आले आहेत. तर चांदीचे काल 253000 हजार रुपये असलेले दर आज 2,48,000 वर खाली आले आहेत.
‘कॅरेट’ म्हणजे नक्की काय?
दागिन्यांवर असलेले 14K किंवा 18K सारखे मार्क सोन्याची शुद्धता दर्शवतात. कॅरेटचा आकडा जेवढा जास्त, तेवढे सोने अधिक शुद्ध असते. मात्र, शुद्ध सोने अत्यंत लवचिक असल्याने त्याचा आकार लवकर बिघडू शकतो किंवा त्यावर ओरखडे (Scratches) पडू शकतात.
सोने मजबूत करण्यासाठी त्यात तांबे किंवा चांदी यांसारखे इतर धातू मिसळले जातात, ज्याला ‘मिश्र धातू’ (Alloy) म्हणतात. कॅरेट सिस्टम हेच सांगते की, त्या विशिष्ट दागिन्यात शुद्ध सोन्याचा किती हिस्सा आहे.
Gold Jewellery : तुमचे सोने किती शुद्ध आहे?
१. २४-कॅरेट (24K): हे ९९.९% शुद्ध असते आणि याचा रंग गडद पिवळा असतो.
२. १८-कॅरेट (18K): यात ७५% शुद्ध सोने आणि २५% इतर धातू असतात. हे रोजच्या वापरासाठी पुरेसे मजबूत असते.
३. १४-कॅरेट (14K): यात ५८.३% शुद्ध सोने असते. १८-कॅरेटच्या तुलनेत हे अधिक कडक आणि टिकाऊ असते, ज्यामुळे ते झिजण्याची शक्यता खूप कमी असते.
आणखी वाचा
Comments are closed.