रोहित आणि जयने आज तरी तसं बोलायला नको होतं, अजितदादांच्या बंधूंनी सौम्य शब्दात कुणाकुणाला खडसाव

बारामती: बारामतीत आज (गुरूवारी,ता २३) अजित पवारांच्या (Ajit Pawar) निधनानंतर बारामतीत विधानसभा पोटनिवडणूक पार पडत आहेत. या निवडणुकीच्या दरम्यान आज आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि जय पवार (Jay Pawar) यांनी २०२९ च्या निवडणुकीबाबत भाष्य केलं, तर रोहित पवारांनी मतदानानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले, बारामतीत 2029 ला पवार विरूध्द पवार ( Pawar VS  Pawar) अशी निवडणूक होण्याची शक्यता आहे,  याबाबत अजित पवारांचे बंधू आणि आमदार रोहित पवारांचे वडिल श्रीनिवास पवार (Shriniwas Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या वक्तव्याबाबत जय पवार आणि रोहित पवार यांच्या वक्तव्यावरती नाराजी देखील व्यक्त केली आहे. आणखी बराच काळ आहे, तीन वर्षे मोठा कालखंड आहे, त्यामुळे आजच्या दिवशी या गोष्टी बोलायची गरज नव्हती असंही पुढे श्रीनिवास पवारांनी म्हटलं आहे.

Shriniwas Pawar Baramati : दोघांनाही आज या क्षणी बोलायचं नाही गरज नव्हती

पवार विरुद्ध पवार असा संघर्ष बारामती व्हावा असं बारामतीकरांना वाटत नाही, असेही रोहित पवार म्हणालेत, मात्र भाजपला वाटतं, यावर उत्तर देताना श्रीनिवास पवार म्हणाले, जर तुम्हाला माहिती आहे, लोकांची इच्छा नाहीये, तर पवारांनी एकत्र बसून समजूतीने घ्यायला हरकत नाही, भाजपाला दोष देऊन काय उपयोग आहे, तुम्हाला जर कळत आहे की कोणीतरी काहीतरी चुकीचं करायला बघत आहे, तरी पण तुम्ही अशी वक्तव्य करत आहात आत्ताही, तर हे चुकीचं आहे, दोघांनाही आज या क्षणी बोलायचं नाही गरज नव्हती, आणखी फार लांब जायचं आहे, आज फार महत्त्वाचा दिवस आहे, आपण सगळे पुढे होऊन दादासाठी सगळं करत आहे, कोणीही विरोधात उभा राहिलेला नाहीये, आता मला वाटते की त्या गोष्टी बोलायची गरज नव्हती.

Shriniwas Pawar Baramati : साहेबांना न विचारता ते दोघांनी वक्तव्य केलं

सर्व परिवाराचा संवाद आहे, पण राजकारण म्हणून फक्त पवार साहेबच निर्णय घ्यायचे, पहिल्यापासून अगदी साठ वर्षे झाली साहेब ठरवतात, कारण ते त्यांचं क्षेत्र आहे. आम्ही कुटुंब म्हणून एक होतो. आता जरा काल साहेबांना ऍडमिट केलं, त्यांची तब्येत बरी नव्हती, एखाद दिवस ते या दोघांना बोलतील, साहेबांना न विचारता ते दोघांनी वक्तव्य केलं त्यामुळे ते बोलतील असंही पुढे श्रीनिवास पवारांनी म्हटलं आहे.

Shriniwas Pawar Baramati : दौरे वाढले आहेत, पण साहेबांचा मतदारसंघ सांभाळायची जबाबदारी …

रोहित पवारांना बारामतीतून निवडणूक लढवायची इच्छा आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना श्रीनिवास पवार म्हणाले, आता ते त्यानेच ठरवायचं आहे, त्याच्या डोक्यात काय आहे ते आपण सांगू शकत नाही, ते सर्व काळच ठरवेल, अलीकडे रोहित पवारांचा बारामतीकडे दौरा वाढलेला दिसत आहे, यावर बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले, हो ते मी पण बघत आहे, दौरे वाढले आहेत, पण साहेबांचा मतदारसंघ सांभाळायची जबाबदारी त्याला घ्यायचे असेल तर सांगता येत नाही, म्हणूनही कदाचित वाढले असतील, असेही पुढे श्रीनिवास पवार यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.