तुम्ही 2029 च्या निवडणुकीत युगेंद्र पवारांविरोधात लढणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगून टाकलं, म

बारामती: बारामतीत आज (गुरूवारी,ता २३) अजित पवारांच्या (Ajit Pawar) निधनानंतर बारामतीत विधानसभा पोटनिवडणूक पार पडत आहेत. या निवडणुकीच्या दरम्यान आज आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि जय पवार (Jay Pawar) यांनी २०२९ च्या निवडणुकीबाबत भाष्य केलं, तर कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना वाटतं आहे की, जय पवार निवडणुकीला उभे राहिले पाहिजेत. याबाबत जय पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.(Jay Pawar on 2029 Vidhansabha Election)

Jay Pawar: मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे….

मागच्या काही दिवसांपासून तुमचे जे दौरे झाले, ज्या पध्दतीने तुम्हा लोकांमध्ये जात आहात, त्यानंतर आता जय पवार विधानसभेचे उमेदवार दिसतील अशी चर्चा सुरू आहे, याबाबत एबीपी माझाशी बोलताना जय पवार म्हणाले की, चर्चा चालू आहे पण मी, सातत्याने बोलत आलो आहे, मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे, त्यामुळे ही फक्त चर्चा आहे. तर रोहित पवारांचं असं म्हणणं होतं की, युगेंद्र पवार तुतारी चिन्हावर आणि जय पवार घड्याळ चिन्हावर आम्हाला पाहायला मिळतील त्यावर जय पवार म्हणाले, नाही. मी माझ्याबद्दल तुम्हाला सांगितलं. त्यांच्या पक्षाचा अधिकार त्यांचा आहे. अजून तर तशी काही माहिती आलेली नाही. त्यामुळे ते जर तसे बोलले असतील, त्यांच्या मनात काही ठरलं असेल, असंही पुढे जय पवारांनी म्हटलं आहे.

Jay Pawar: असे दुसरे मुद्दे काढायची गरज नाहीये….

तर श्रीनिवास पवारांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे, आज मतदानाचा दिवस आहे. आज बोलायच्या या गोष्टी नव्हत्या, मग रोहित पवार असो किंवा रोहित पवार असतील, त्यांना आज या गोष्टी काढायची गरज नव्हती, नाही. बरोबर आहे. ही निवडणूक दादांसाठी आणि वहिनींसाठी समोरं चाललो आहे. तर असे दुसरे मुद्दे काढायची गरज नाहीये, असंही पुढे जय पवारांनी म्हटलं आहे. 2029ला वहिनी बाजूला होतील आणि जय पवार त्या जागी असेल सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यावर बोलताना जय पवार म्हणाले, सुप्रिया सुळे यांच्यासोबत बोलणं झालं, असं काही नाही आहे.

Jay Pawar: आता तरी माझ्या मनात असं काही नाही………..

लोकांची इच्छा आहे, जय पवार आम्हाला दिसले पाहिजेत असं ते म्हणत आहेत, त्यावर बोलताना जय पवार म्हणाले, लोकांची इच्छा जरी असली तरी वेळ आल्यावर बघुआ काय करायचं. आता तरी माझ्या मनात असं काही नाही. मी तुम्हाला माझ्या भावना सांगितल्या आहेत. मला पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच काम करायचं आहे. वहिनी आणि पार्थदादा आहेतच असंही पुढे ते म्हणालेत.

Jay Pawar:  माझ्या मनात काहीच नाही. वेळ आल्यावर बघूया…..

विधान परिषद निवडणूक तोंडावर आहे, तुम्हाला विधान परिषदेवर जायला आवडेल का? यावर उत्तर देताना जय पवार म्हणाले, आत्ता माझ्या मनात काहीच नाही. वेळ आल्यावर बघूया. अजित पवारांच्या बाबत असं झाल होतं की त्यांचा ताफा थांबवण्यात आला आणि त्यांनी निवडणूक लढावी असा आग्रह लोकांनी धरला त्यानंतर त्यांनी निवडणूक लढली.

Jay Pawar: आत्तापर्यंत २५ टक्क्यांपर्यंत मतदान झालं

मतदानाबाबत बोलताना जय पवार म्हणाले, आत्तापर्यंत २५ टक्क्यांपर्यंत मतदान झालं आहे. ८० ते ८५ टक्के मतदान होईल असं वाटतंय असंही ते म्हणालेत. उन्हाचा चटका आहे, परंतु लोक बाहेरून पासून मतदान करत आहेत. बारामतीकरांना आम्हाला सवय आहे, लवकर उठून काम करायचं मतदान करायचं त्यानुसार केलं आहे. अजित दादांची आठवण येतेय, लोकं म्हणतायत तुम्ही आला म्हणजे दादा आले असं वाटलं, असंही जय पवारांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.