मिचेल स्टार्क लवकरच दिल्ली कॅपिटल्समध्ये होणार सामील, वेगवान गोलंदाजाच्या येण्याने मात्र संघाची डोकेदुखी वाढणार?

आयपीएल २०२६ मध्ये सध्या दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाचे वृत्त समोर येत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला आयपीएलच्या या १९ व्या हंगामात खेळण्यास होकार दिला आहे. त्यामुळे आता डीसीच्या संघामध्ये मोठा बदल दिसणार आहे, मात्र त्याच्या येण्याने संघासमोर एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. ती कशी ते जाणून घेऊ.

स्टार्क शुक्रवारी (२४ एप्रिल) डीसीमध्ये सामील होणार असून तो १ मे ला खेळल्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असण्याची माहिती समोर येत आहे. तो कोपर आणि खांद्याच्या दुखापतीमुळे जानेवारीपासून मैदानाबाहेर आहे. त्याआधी त्याने ऍशेस मालिकेत पाचही सामने खेळताना महत्त्वाची कामगिरी केली होती. यामुळे त्याला मालिकावीर पुरस्कारही मिळाला होता.

डीसीचे संघव्यवस्थापक आधीपासूनच स्टार्क आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संपर्कात होते. तो २० एप्रिलपर्यंत संघाशी जोडला जाईल अशी आशा त्यांना होती, मात्र तसे काही झाले नाही. आता त्याला ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डने खेळण्याची परवाणगी दिली आहे. यामुळे तो लवकरच संघात सामील होणार आहे. त्याच्या येण्याने मात्र संघनिवडीबाबत डोकेदुखी निर्माण होणार आहे.

पुढील सामन्यांसाठी डीसीच्या अंतिम अकरामध्ये बदल दिसणार आहे. त्यांना चार विदेशी खेळाडू कोणते हे नीट हुशारीने निवडावे लागणार आहे. संघात सध्या पथुम निसांका, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स आणि लुंगी एनगिडी खेळत असून ते चौघेही उत्तम कामगिरी करत आहेत. स्टार्क संघात परतल्यावर नेमके कोणाला बाकावर बसावे लागेल ही एक एक मोठी आणि उत्तम अडचण संघव्यवस्थापनासमोर निर्माण झाली असेल.

डीसीकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. साहिल पारेखला ते कधी संधी देतात, याकडेही लक्ष असणार आहे. त्याने हंगामाआधीच्या शिबिरामध्ये प्रभावी कामगिरी केली होती. त्याने त्याच्या फलंदाजीने मुकेश कुमार आणि टी नजराजन यांनादेखील चकित केले होते.

मागील हंगामात स्टार्कने डीसीसाठी ११ सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेतल्या होत्या. सध्या संघाने सहा सामने खेळले असून त्यातील तीन जिंकले आणि तीन गमावले आहेत. यामुळे संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. संघासाठी आता पुढील सामने प्लेऑफसाठी महत्वाचे असणार आहेत. त्यात स्टार्क जोडला जाणार असल्याने तो अंतिम टप्प्यात चांगली कामगिरी करण्याची आशा आहे.

Comments are closed.