बीड जेलमधील ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये ट्विस्ट, मस्साजोगच्या इलेक्शनसाठी वाल्मीक कराडला टार

बीड : बीडच्या जिल्हा (Beed Jail) कारागृहात वाल्मिक कराड (walmik Karad) गँगच्या सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर गुन्ह्यातील एका कैद्याने अझर अब्दुल रहमान पठाण या कैद्याला मारहाण केल्याची एक कथित ऑडिओ क्लिप काल (बुधवारी, ता २२) व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपनंतर आज (गुरूवारी, ता २३) कैदी अझर पठाण याची दुसरी ऑडिओ क्लिप समोर आली असून मारहाण झाल्याचा दावा खोटा ठरवला आहे.(Beed Crime News)

Walmik Karad Beed : आज समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमधील संवाद काय?

– अझर पठाण आणि अज्ञात व्यक्तीतीचे संभाषण
–  जेलमध्ये थोडा वाद झाला होता. वाद मिटला मात्र सनी आठवले आणि परभणे नामक कैद्याने शिकवून हे करायला सांगितले.
– यामध्ये जेलमधील एक कर्मचारी आहे. त्यांनी दादागिरी करून हे करायला भाग पाडले.
– यात जरांगे पाटील यांचे काही नाही सध्या मस्साजोगचे इलेक्शन आहे त्यातून हे केले
– मस्साजोगचे इलेक्शन असल्याने वाल्मीक अण्णा कराड यांना टारगेट बनवत आहेत त्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे
– असा वाद काहीही झाला नाही. माझा वाद झाला तो मिटलेला आहे. त्यांच्या दबावात येऊन मी हे केलं होतं.
– त्यात जरांगे पाटील यांचा देखील विषय नाही.
– मसाजोग इलेक्शन सुरू असल्याने बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा त्याच कैद्याकडून केला जात आहे.

या ऑडिओ क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाही. मात्र जिल्हा कारागृहातून अशा धक्कादायक ऑडिओ क्लिप समोर येत असल्याने नेमकं जिल्हा कारागृहात चाललय काय? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

Walmik Karad Beed : जिल्हा कारागृहातील प्रकाराबद्दल मुख्यमंत्र्यांची भेट घेणार – धनंजय देशमुख

बीड जिल्हा कारागृहात जेलर बदली पासून जे प्रकार होत आहेत,, ते कारागृह प्रशासनाने गांभीर्याने घेतले पाहिजेत. परंतु तसं होताना दिसत नाही असं धनंजय देशमुख म्हणाले आहेत. याबाबत मी येत्या काही दिवसात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही देशमुख म्हणाले. याबाबत मुख्यमंत्र्यांना एक अर्ज देणार असून कारागृहातील कैद्यांना कोण अभय देत आहे त्यांना कशाप्रकारे ट्रीटमेंट दिली जात आहे. या संदर्भात चर्चा करून गंभीर पावले उचलण्यासाठी मी विनंती करणार आहे.

Walmik Karad Beed : काल व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये काय होतं?

काल व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मारहाण झालेल्या कैद्याने गंभीर आरोप केले होते. “माझ्या हाताला गंभीर मारहाण झाली. जेल प्रशासन माझं काहीही ऐकत नाही. त्यांनी पैसे घेतले आहेत. मला धमक्या दिल्या जात आहेत,” असा दावा त्या ऑडिओमध्ये करण्यात आला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि शंकर शेप या तिघांनी मारहाण केली. माझ्या हाताला गंभीर मारहाण झाली. जेल प्रशासन माझं काहीही ऐकून घेत नाही, त्यांनी पैसे खाल्ले आहेत. जेलर यांना याबाबत माहिती दिली, पण त्यांनी काहीही ऐकून घेतलं नाही. उलट माझ्यावर दमदाटी करून जेल बदली करण्याची धमकी दिली.

याची तक्रार कुठेही करा, माझं काहीही वाकड होत नाही अशी धमकी जेलरने दिली. जेलमध्ये मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज देखील आहे. मला दवाखान्यात देखील घेवून जाण्यात आले नाही. वाल्मिक अण्णाकडे मला बोलावलं जात आहे, असं त्या कैद्याने सांगितल्याचं ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहे. दरम्यान, या प्रकरणात कारागृह प्रशासनाने वेगळी भूमिका घेतली आहे. कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी सांगितले की, मारहाण झालेल्या कैद्याला विचारणा करण्यात आली होती. मात्र त्याने कोणतीही तक्रार नसल्याचं लेखी दिलं आहे. व्हायरल होत असलेल्या या ऑडिओक्लिपमध्ये मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याचा उल्लेख आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलं आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.