डायबिटीजवाल्यांनी आंबा खायचा की नाही ?





सध्या आंब्याचा मोसम आहे. यामुळे बाजारात मुबलक प्रमाणात आंबा उपलब्ध आहे. यामुळे आंबाप्रेमी खुश आहेत. पण ज्यांना मधुमेह म्हणजेचे डायबिटीज असणाऱे मात्र इच्छा असूनही या दिवसात आंब्यापासून लांब राहतात. आंब्यात साखरेचे प्रमाण अधिक असल्याने शुगर वाढेल अशी भिती डायबिटीजग्रस्तांना असते. पण खरंच डायबिटीजरुग्णांनी आंबा खाऊच नये का?यावर तज्त्र काय सांगतात ते बघूया.

सोशल मीडियावर लाईफस्टाईल एक्सपर्ंट ल्युक कोटी्नहोचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात तो आंबा खाण्यास घाबरू नका. पण खाताना काळजी घ्या सागंतो. विशेष करून आंबा रात्री खाऊ नये. कारण त्यात नैसर्गिक साखर अधिक असते. रात्रीच्या वेळी आपल्या शरीराची हालचाल नसते. यामुळे शुगर वाढते. त्यापेक्षा आंबा दही, बिया, मेव्याबरोबर खाण्याचा सल्ला कोटी्नहोने दिला आहे. आंब्यामद्ये मैंगिपेरिन नावाचा घटक असतो. ज्यातील अँटी डायबिटीक गुण शरीरासाठी फायदेशीर असतात. पण असे असले तरी ज्यांना डायबिटीज असेल अशांनी आंबा प्रमाणात खाण्यास हरकत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीची शरीररचना वेगवेगळी असते. यामुळे काहींजणांमध्ये आंबा खाल्यानंतर शुगर पटकन वाढते. तर काहींमध्ये शुगरमद्ये फारसे बदल होत नाहीत.



Comments are closed.