Chandrapur News – गोंडपिपरी एमआयडीसीविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; प्रशासनाविरोधात संताप उसळला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

“आपली शेती, आपला हक्क” आणि “जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” अशा गगनभेदी घोषणा देत गोंडपिपरी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राविरोधात शेतकऱ्यांनी आपला एल्गार तीव्र केला आहे. मंगळवारी (21 एप्रिल 2026) तहसील कार्यालयावर धडक देत हजारो शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या अभूतपूर्व आणि आक्रमक आंदोलनात 12 गावांतील शेतकरी, शेतमजूर, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, ज्यामुळे संपूर्ण तहसील परिसर दणाणून गेला होता.

आंदोलकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर कडाडून टीका करताना सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचा बळी देऊन केवळ उद्योगपतींचे हित जपले जात असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, उद्योगमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की, आमची जमीन हिरावून घेण्याचा कुठलाही डाव यशस्वी होऊ दिला जाणार नाही. भूसंपादन प्रक्रियेत आवश्यक असलेल्या सामाजिक व पर्यावरणीय परिणाम अहवालात पारदर्शकतेचा अभाव असून, प्रशासनाकडून घेतली जाणारी सार्वजनिक सुनावणी ही केवळ एक औपचारिकता असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. आमची संमती न घेता जमीन घेण्याचा अधिकार कोणालाही नसून, हा आमच्या मूलभूत हक्कांवर केलेला थेट आघात असल्याचे आंदोलकांनी निक्षून सांगितले.

Chandrapur News – 300 रुपये द्या आणि मोबाईलवर बिनधास्त कॉपी करा, चंद्रपूरमध्ये परीक्षेचा खेळखंडोबा

“आम्हाला जमिनीचा मोबदला नको, पण आम्ही आमची जमीनही देणार नाही,” अशी ठाम भूमिका घेत शेतकऱ्यांनी प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे. गोंडपिपरी औद्योगिक संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले असून, जोपर्यंत एमआयडीसी प्रकल्प पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे. प्रशासनाने यावर तातडीने निर्णय न घेतल्यास आगामी काळात रास्ता रोको, बंद आणि जिल्हा स्तरावर अधिक उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याची तयारीही शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.

Comments are closed.