ATM मधून 63 लाखांची चोरी, कांदिवली पोलिसांनी मोठी कारवाई, 6 तासातच दोन आरोपींना अटक
मुंबई क्राईम न्यूज : मुंबईतील कांदिवली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ATM मधून 63 लाख 93 हजार 800 चोरी प्रकरण उघड झाले आहे. अवघ्या 6 तासात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. CSM इकोसिस्टम लिमिटेडच्या ATM मध्ये ही घटना घडली आहे. पैसे भरण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांकडून बॅग पळवली होती. कारमधून आरोपी फरार झाला होता.
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी वेगानं तपासाची सुत्रे फिरवली
दरम्यान, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी वेगानं तपासाची सुत्रे फिरवली. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. त्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावर पाठलाग करून कार अडवली. आरोपींकडून संपूर्ण 63.93 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्ात आली आहे. मुख्य आरोपीसह साथीदारालाही बेड्या घालण्यात आल्या आहेत. आरोपी कांदिवली व बोरिवली परिसरातील रहिवासी आहे. कांदिवली पोलिसांनी जलद कारवाई करत गुन्हा उघडकीस आणला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची यशस्वी कामगिरी केली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.