‘संजय गायकवाडांमुळे एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी होते, आमचा त्यांच्या वक्तव्याशी संबंध नाही’; श

शिवाजी कोन्होटा पुस्तकावर संजय गायकवाड: कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरुन प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, या प्रकरणात शिवसेनेची (Shivsena) पहिली प्रतिक्रिया आली असून पक्षाने संजय गायकवाड यांची पाठराखण करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. संजय गायकवाड यांच्या अशा वक्तव्यांमुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे (मराठी) यांची बदनामी होते, असे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केले आहे. (Maharashtra Politics news)

संजय गायकवाडची जी ऑडिओ क्लीप फिरतेय, त्याची सत्यता माहिती नाही. पण संजय गायकवाडांच्या वक्तव्याशी आणि विचाराशी पक्षाचा संबंध नाही, हे त्यांचं वैयक्तिक मत, पक्ष त्याचे समर्थन करत नाही, असे प्रकाश महाजन यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे या प्रकरणात शिवसेना पक्ष आणि नेतृत्त्वाने हात वर केले असून यामुळे संजय गायकवाड यांच्या अडचणी  वाढल्या आहेत. संजय गायकवाड हे आमदार आहेत, त्यांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे. त्यांनी वापरलेली भाषा चूक आहे. या सगळ्यामुळे एकनाथ शिंदे आणि पक्षाची बदनामी होते, हे संजय गायकवाडच्या लक्षात येत नाही. मी प्रवक्ता म्हणून एवढेच सांगेन की, आम्ही त्यांच्या विचारांशी सहमत नाही.  एका पुस्तकावरुन अशाप्रकारे शिवीगाळ करणे आणि पुस्तकाची सत्यता काय आहे, हे जाणून न घेता प्रतिक्रिया देणे संयम नसल्याचे द्योतक आहे. पण त्यांच्या अशा वागण्याने पक्ष नेतृत्त्वावर आक्षेप येईल, हे गायकवाडच्या लक्षात आलं नाही, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले.

यावेळी प्रकाश महाजन यांनी संजय गायकवाड यांच्यावर पक्ष कारवाई करणार का, याबाबत स्पष्ट उत्तर देणे टाळले. संजय गायकवाड  यांच्यावरील कारवाईबाबत एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील. प्रवक्ता म्हणून मी पक्ष त्यांच्या विचारांशी सहमत नाही, एवढेच सांगेन, असे महाजन यांनी स्पष्ट केले. संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर काल विधानपरिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गायकवाड यांचे तोकडे समर्थन करण्याचा प्रयत्न केला होता. संजय गायकवाड यांची भूमिका योग्य होती पण त्यांनी जी कृती केली ती योग्य नव्हती, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले होते. मात्र, आता शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी या प्रकरणात पक्ष संजय गायकवाड यांच्यासोबत नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता भविष्यात या विषयात शिवसेनेतील इतर कोणताही नेता संजय गायकवाड यांच्या पाठीशी उभा राहण्याची शक्यता फार कमी आहे.

आणखी वाचा

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांविरोधात तक्रार दाखल करायला गेलेल्या प्रकाशकाला पोलिसांनी काय सांगितलं, गुन्हा दाखल करुन घेतला का?

आणखी वाचा

Comments are closed.