वर्कींग वुमनसाठी “रेडी टू वेअर साडी”
साडी हा महिलांचा आवडता पेहराव जरी असला तरी रोजच्या ऑफिसच्या धावपळीत वर्कींग वुमन्ससाठी परफेक्ट साडी ड्रेप करुन ऑफिसला जाणं शक्य होत नाही. कारण साडी चापूनचोपून नेसणं सगळ्याच जणींना जमत नाही. त्यामुळे साडी नेसणे हा टास्क होवून जातो. यात बराच वेळ जातो त्यामुळे ऑफिसला उशीर होतो. यामुळे अनेकजणी इच्छा असूनही साडी नेसणं टाळतात. यावर रेडी टू वेअर साडी ही प्रत्येक वर्किंग वुमनसाठी एक परफेक्ट पर्याय ठरते. त्यासोबत रेडी टू वेअर साडी नेसण्यामागे इतर कारणही आहेत. कोणती आहेत ती कारणे ते बघूया.
वेळेची बचत
रेडी टू वेअर साडी ही आधीच प्री-स्टिच्ड असल्यामुळे नेसावी लागत नाही तर ड्रेसप्रमाणे घालावी लागते. तेही अवघ्या काही मिनिटांत! त्यामुळे बराच वेळ वाचतो.
draping
ज्या महिलांना साडी नीट नेसता येत नाही त्यांच्यासाठी ही साडी बेस्ट आहे. कारण यात प्लीट्स म्हणजेच साडीच्या नीऱ्या आधीच सेट असतात. त्यामुळे तो वेळ वाचतो.
आरामदायक
मुख्य म्हणजे रेडी टु वेअर साड्या या हलक्या आणि आरामदायक फॅब्रिकच्या असतात. त्यामुळे दिवसभर काम करतानाही सहज वाटते.
प्रोफेशनल आणि एलिगंट लूक
सिंपल आणि सॉफ्ट डिझाइन्समुळे ऑफिसमध्ये एक क्लासी आणि प्रोफेशनल इम्प्रेशन पडते.
ट्रॅव्हल फ्रेंडली
मीटिंग्स किंवा ट्रॅव्हलसाठी ही साडी सोयीची आहे.
शैली टिप
रेडी टू वेअर साडीसोबत मिनिमल ज्वेलरी आणि नीटनेटका हेअरस्टाईलमुळे तुमचा लूक आणखी उठून दिसतो.
Comments are closed.