चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचे खास अर्धशतक! जीटीविरुद्धच्या विजयांनतर विराट कोहलीच्या संघाची 'या' यादीत एंट्री
आयपीएल २०२६ मध्ये शुक्रवारी (२४ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स सामना रंगलाय या स्पर्धेत आरसीबीचे घरचे मैदान बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियम आहे. येथेच हा सामना खेळला गेला, ज्यामध्ये आरसीबीने विजय मिळवत ऐतिहासिक अर्धशतक पूर्ण केले आहे.यामुळे आयपीएलच्या इतिहासात एकाच मैदानावर ५० किंवा त्यापेक्षा अधिक सामने जिंकणारा आरसीबी तिसरा संघ ठरला आहे,
मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यानंतर आरसीबी हा एकाच मैदानावर ५० किंवा त्यापेक्षा अधिक सामने जिंकणारा चौथा संघ ठरला आहे. एमआयने वानखेडे या त्यांच्या घरच्या मैदानावर आयपीएलमध्ये ५८ सामने जिंकले आहेत. केकेआरने कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर ५५ आणि सीएसकेने चेन्नईच्या चेपॉकवर ५३ सामने जिंकले आहेत.
या यादीत सनरायझर्स हैद्राबाद पाचव्या स्थानी आहे. त्यांनी हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत ४० सामने जिंकले आहेत. पहिल्या चार संघांच्या तुलनेत हा संघ उशिरा आयपीएलमध्ये दाखल झाला. त्यांची कामगिरी पाहता लवकरच ते ही घरच्या मैदानावर ५० सामने जिंकण्याचा मान पटकावतील. तसेच २००८ पासून काही संघ या स्पर्धेत सातत्याने खेळत आहे, मात्र ते या यादीत अजूनही दाखल झालेले नाहीत.
आयपीएलमध्ये एकाच मैदानावर एखाद्या संघाचे सर्वाधिक विजय –
५८ – एमआय (वानखेडे)
५५ – केकेआर (कोलकाता)
५३ – CSK (चेन्नई)
५० – आरसीबी (बंगळुरू)*
40 – SRH (हैदराबाद)
(*सुपर ओव्हरमधील विजयांसह)
शुक्रवारी खेळल्या गेलेल्या आरसीबी विरुद्ध जीटी सामन्याआधी दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड ३-३ असे होते, आता मात्र विजयानंतर आरसीबीने ४-३ अशी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे हे सर्व सात विजय लक्ष्याचा पाठलाग करतानाच दोन्ही संघांनी मिळवले आहेत. यावरून दोन्ही संघ एकमेंकाविरुद्ध एकदाही धावसंख्येचा यशस्वीरित्या बचाव करू शकला नाही.
आयपीएलच्या सुरू असलेल्या १९ व्या हंगामात जीटीने प्रथम फलंदाजी करताना साई सुदर्शनच्या शतकी खेळीच्या जोरावर २० षटकात ३ विकेट्स गमावत २०५ धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४४ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ८१ धावा केल्या. हा सामना आरसीबीने ७ चेंडू आणि ५ विकेट्स शिल्लक राखत जिंकला.
Comments are closed.