पॉवरप्लेमध्ये दिल्लीचा धमाका; पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई! जाणून घ्या LIVE अपडेट्स

आयपीएल 2026 च्या 35 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने आले आहेत.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय दिल्लीसाठी आतापर्यंत तरी फायदेशीर ठरल्याचे दिसत आहे.

पहिल्या 6 षटकांच्या अखेरीस दिल्ली कॅपिटल्सने 1 बाद 68 धावा ठोकल्या असून त्यांचा धावगतीचा वेग (Run Rate) 11.33 इतका आहे.

दिल्लीच्या सलामीवीरांनी डावाची सुरुवात आक्रमक केली. श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांका याने 11 चेंडूत 17 धावा केल्या, मात्र तो अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर प्रभसिमरन सिंगकडे झेल देऊन बाद झाला.

निसांका बाद झाल्यानंतर कर्णधार केएल राहुल आणि नितीश राणा यांनी पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

केएल राहुल 16 चेंडूत नाबाद 35 धावा आणि नितीश राणा 13 चेंडूत नाबाद 22 धावा खेळत आहे.

Comments are closed.