DC vs PBKS: के एल राहुल-नितीशची ऐतिहासिक कामगिरी! दिल्ली कॅपिटल्ससाठी मोडला 15 वर्षांपूर्वीचा विक्रम
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 19 व्या हंगामातील 35 वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स (DC vs PBKS) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, जो केएल राहुल आणि नितीश राणा यांनी आपल्या कामगिरीने सार्थ ठरवला. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 95 चेंडूत 220 धावांची तुफानी भागीदारी केली. नितीश राणा 44 चेंडूत 91 धावा करून बाद झाला, तेव्हा ही ऐतिहासिक भागीदारी संपुष्टात आली.
दिल्ली कॅपिटल्ससाठी याआधी कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम वीरेंद्र सेहवाग आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या नावावर होता. त्यांनी 2011 मध्ये 146 धावा जोडल्या होत्या. राहुल आणि राणा यांनी तब्बल 15 वर्षांनंतर हा विक्रम मोडीत काढला असून, आता ती दिल्लीसाठी ‘नंबर 1’ ची जोडी ठरली आहे.
दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वात मोठ्या भागीदारी
केएल राहुल आणि नितीश राणा 220 (2026)
वीरेंद्र सहवाग आणि डेव्हिड वॉर्नर 146 (2011)
मयंक अग्रवाल आणि युवराज सिंह 106 (2015)
मयंक अग्रवाल आणि श्रेयस अय्यर 106 (2015)
केएल राहुल आणि नितीश राणा यांची 220 धावांची ही भागीदारी आता IPL इतिहासातील दुसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांचा 229 धावांचा जागतिक विक्रम मोडण्यापासून ही जोडी केवळ 10 धावांनी मुकली.
IPL इतिहासातील टॉप 5 भागीदारी
एबी डिविलियर्स आणि विराट कोहली: 229 धावा (2016, विरुद्ध गुजरात लायन्स)
केएल राहुल आणि नितीश राणा: 220 धावा (2026, विरुद्ध पंजाब किंग्स)
एबी डिविलियर्स आणि विराट कोहली: 215 धावा (2015, विरुद्ध मुंबई इंडियन्स)
केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक: 210 धावा (2022, विरुद्ध केकेआर)
साई सुदर्शन आणि शुभमन गिल: 210 धावा (2024, विरुद्ध सीएसके)
Comments are closed.