DC vs PBKS: केएल राहुलची स्फोटक फलंदाजी! अभिषेक शर्माचा 'तो' मोठा रेकॉर्ड उध्वस्त

दिल्ली कॅपिटल्सने आपल्या घरच्या मैदानावर पंजाब किंग्सविरुद्ध खेळताना प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 2 बाद 264 धावांचा डोंगर उभा केला. दिल्ली कॅपिटल्सच्या आयपीएल (IPL) इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वोच्च स्कोअर ठरला आहे. या सामन्यात स्टार सलामीवीर केएल राहुलने (KL Rahul) आपल्या फलंदाजीने कमाल केली. त्याने आयपीएल कारकिर्दीतील 6 वे शतक झळकावत 67 चेंडूत 16 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 152 धावांची नाबाद खेळी केली. अशा प्रकारे 150 हून अधिक धावा करणारा तो आयपीएल इतिहासातील तिसराच खेळाडू ठरला आहे.

आयपीएलमध्ये भारतीय खेळाडू म्हणून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम आता केएल राहुलच्या नावावर झाला आहे. यापूर्वी 2025 मध्ये अभिषेक शर्माने पंजाबविरुद्ध 141 धावा केल्या होत्या. राहुलने आता 152 धावा करत हा विक्रम मोडला आहे.

IPL इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

क्रिस गेल- 175 पुणे वॉरियर्स (2013)
ब्रँडन मॅक्क्युलम- 158 आरसीबी (2008)
केएल राहुल- 152* पंजाब किंग्ज (2026)
अभिषेक शर्मा-१४१ पंजाब किंग्स (२०२५)
क्विंटन डी कॉक-१४० एलएसजी (२०२२)

केएल राहुल आता टी-20 क्रिकेटमध्ये 150 किंवा त्याहून अधिक धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी 2024 मध्ये तिलक वर्माने (Tilak verma) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मेघालयविरुद्ध 151 धावांची खेळी केली होती. राहुलने आता 152 धावा करत त्यालाही मागे टाकले आहे.

T20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

केएल राहुल: १५२ धावा (वि. पंजाब, २०२६)
टिळक वर्मा: 151 धावा (विरुद्ध मेघालय, 2024)
अभिषेक शर्मा: 148 धावा (विरुद्ध बंगाल, 2025)
श्रेयस अय्यर: 147 धावा (विरुद्ध सिक्कीम, 2019)
पुनीत बिष्ट: 146 धावा (विरुद्ध मिझोरम, 2021)

Comments are closed.