11 मिनिटांत ॲम्ब्युलन्स मैदानातून रुग्णालयात, लुंगी एनगिडीच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट, कॅच घेत

लुंगी एनगिडी दुखापती अद्यतन: दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी याच्या दुखापतीबाबत मोठं अपडेट समोर आलं आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात कॅच पकडताना डोक्यावर जोरात जमिनीवर आपटला. त्यानंतर त्याला तातडीने ॲम्ब्युलन्समधून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र दिलासादायक बाब म्हणजे एनगिडीची प्रकृती आता स्थिर असून लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे.

नेमकं काय घडलं? (Lungi Ngidi News In Marathi)

पंजाब किंग्सचा फलंदाज प्रियांश आर्याने मारलेल्या उंच फटक्यावर एनगिडी कॅच घेण्यासाठी धावत गेला होता. पण संतुलन बिघडल्याने तो मागे पडला आणि त्याचं डोकं जोरात आदळलं. कॅचही सुटला आणि एनगिडी बराच वेळ मैदानावरच निश्चल पडून होता. त्यावेळी फिजिओ आणि मेडिकल टीम तात्काळ धावून आली.

या गंभीर प्रसंगामुळे सामना सुमारे 15 मिनिटं थांबवावा लागला. नंतर एनगिडीला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आलं आणि मैदानात ॲम्ब्युलन्स बोलावण्यात आली. परिस्थितीची गंभीरता पाहता संपूर्ण स्टेडियममध्ये काही काळ शांतता पसरली होती. डोके आणि मान दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्याला बीएलके-मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

11 मिनिटांत ॲम्ब्युलन्स रुग्णालयात…

दरम्यान, ॲम्ब्युलन्सला वेगाने रुग्णालयात पोहोचवण्यासाठी दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केला. एसीपी ट्रॅफिक (सेंट्रल) संजय सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गर्दीच्या वाहतुकीतून मार्ग मोकळा करत केवळ 11 मिनिटांत एनगिडीला रुग्णालयात पोहोचवलं.

ताज्या माहितीनुसार, एनगिडीची प्रकृती सुधारत असून तो पुढील सामना खेळणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. दिल्ली कॅपिटल्सचा पुढचा सामना 27 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध होणार आहे. एनगिडीच्या जागी विप्रज निगम कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणून मैदानात उतरला होता. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करत 264 धावा केल्या होत्या. मात्र श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंगच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर पंजाब किंग्सने 265 धावांचं लक्ष्य गाठत आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा यशस्वी रन चेस पूर्ण केला.

हे ही वाचा –

Vaibhav Sooryavanshi Century : 12 षटकार अन् 36 चेंडूंत 100 धावा! 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचे वादळी शतक; अनोख्या’ सेलिब्रेशनने सर्वांना कोड्यात पाडलं, नेमकं काय केलं?

आणखी वाचा

Comments are closed.