राजस्थानच्या पिंक सिटीत हैदराबादचा धिंगाणा! वैभवचं वादळी शतक शर्मा-किशनच्या त्सुनामी पुढे ठरलं
राजस्थान रॉयल्स VS सनरायझर्स हैदराबाद IPL 2026 : आयपीएल 2026 च्या 36व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) यजमान राजस्थान रॉयल्सवर (RR) 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर धावांचा पाऊस पडलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात हैदराबादने राजस्थानचे 229 धावांचे विशाल आव्हान लिलया पेलले. वैभव सूर्यवंशीच्या तुफानी शतकाच्या जोरावर राजस्थानने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 228 धावांचा डोंगर उभा केला. अभिषेक शर्मा आणि इशान किशनच्या अर्धशतकांमुळे विजयाचा पाया रचला गेला आणि अखेर हैदराबादने 6 गडी राखून या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.
वैभव सूर्यवंशीची शतकी खेळी
वैभव सूर्यवंशीने यशस्वी जैस्वालसोबत डावाची सुरुवात केली. पण जैस्वाल लवकर बाद झाला, पण त्यानंतर वैभवने जबाबदारी स्वीकारत तुफानी कामगिरी केली. त्याने अवघ्या 37 चेंडूत 5 चौकार आणि तब्बल 12 षटकारांच्या जोरावर 103 धावांची तुफानी खेळी साकारली आणि त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले.
ध्रुव जुरेलचेही अर्धशतक
वैभवला ध्रुव जुरेलची उत्कृष्ट साथ मिळाली. जुरेलने 35 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार ठोकत 51 धावा केल्या. तर डोनोवन फरेराने 16 चेंडूत 33 धावा केल्या, ज्यात 3 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. रियान पराग (7) आणि शिमरोन हेटमायर (11) मोठी खेळी करू शकले नाहीत. हैदराबादकडून ईशान मलिंगाने सर्वाधिक प्रभावी गोलंदाजी करत 2 विकेट घेतल्या. कर्णधार पॅट कमिन्स तसेच प्रफुल्ल हिंगे, साकिब हुसेन आणि नीतीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी 1 विकेट मिळवली.
राजस्थानच्या पिंक सिटीत हैदराबादचा धिंगाणा!
राजस्थानने दिलेल्या 229 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही जोडी मैदानात उतरली. मात्र हेड पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि फक्त 6 धावांवर बाद झाला. यानंतर अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांनी शानदार शतकी भागीदारी करत संघाला सामन्यात परत आणले. अभिषेकने फक्त 29 चेंडूत 57 धावांची तुफानी खेळी करत 10व्या षटकात विकेट गमावली. दुसऱ्या बाजूला ईशान किशननेही 31 चेंडूत 74 धावांची खेळी केली आणि हैदराबादसाठी विजयाचा मजबूत पाया रचला. यानंतर हेनरिक क्लासेन आणि नीतीश रेड्डी यांनी महत्त्वाची भागीदारी उभी केली. नीतीश रेड्डी 36 धावा करून बाद झाला, तर क्लासेनने 29 धावांचे योगदान दिले. शेवटी सलिल अरोरा आणि अनिकेत यांनी संयमी फलंदाजी करत सामना संपवला आणि हैदराबादने 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला.
Points Tableमध्ये हैदराबाद कुठे आहे?
पंजाब किंग्जने या हंगामात कमालीचे सातत्य दाखवले आहे. खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 6 सामन्यांत त्यांनी विजय मिळवला असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. 13 गुणांसह ते गुणतालिकेत राजाच्या थाटात पहिल्या क्रमांकावर विराजमान आहेत. गुणतालिकेत दुसऱ्या ते चौथ्या क्रमांकासाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू 10 गुण मिळवून आरसीबी दुसऱ्या स्थानावर आहे.
सनरायझर्स हैदराबादने 8 सामन्यांत 5 विजय मिळवले असून सरस धावगतीमुळे ते तिसऱ्या स्थानावर आहेत. राजस्थाननेही 8 सामन्यांत 10 गुण मिळवले आहेत, मात्र गेल्या 5 सामन्यांतील 3 पराभवांमुळे त्यांच्या कामगिरीत काहीशी घसरण दिसून येत आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.