15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा धमाका! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढत रचला इतिहास

आयपीएल (IPL) 2026 च्या 36 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan royals) खेळताना वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) इतिहास रचला. जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात त्याने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई करत अवघ्या 36 चेंडूत शतक ठोकले. या झंझावाती खेळीत त्याने 12 षटकार आणि 5 चौकार मारले. विशेष म्हणजे, वैभवने याआधी IPL 2025 मध्ये 35 चेंडूत शतक झळकावले होते.

या सामन्यात त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि सर्वांनाच चकित करून सोडले.

हैदराबादविरुद्ध 45 धावा पूर्ण करताच वैभवने T20 क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या. अवघ्या 15 वर्षे 29 दिवस या वयात हा टप्पा गाठणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने आपल्या 26 व्या डावात हे यश मिळवले.

T20 मध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारे भारतीय फलंदाज

देवदत्त पडिक्कल- 25
वैभव सूर्यवंशी- 26
रोहन कदम- 27
सचिन तेंडुलकर- 31
अंकित लांबा- 32

वैभवने IPL मध्ये तिसऱ्यांदा 15 चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. आयपीएल 2026 च्या 7 सामन्यांत त्याने 200 च्या स्ट्राइक रेटने 357 धावा केल्या आहेत.

आयपीएल 2025 मध्येही गुजरात टायटन्सविरुद्ध शतक झळकावून टी20 इतिहासातील सर्वात तरुण ‘शतकवीर’ ठरला होता. त्या हंगामात 8 सामन्यांत 292 धावा केल्या होत्या. तेच सातत्य कायम राखत त्याने पुन्हा एकदा 36 चेंडूत शतक झळकावून आपली क्षमता सिद्ध केली आहे. वैभव सूर्यवंशी हा भारतीय क्रिकेटचा पुढचा मोठा सुपरस्टार मानला जात असून, त्याच्या बॅटने सध्या मोठ-मोठे विक्रम रचले जात आहेत.

Comments are closed.