शिरूरमध्ये माणुसकीचे दर्शन… नगरसेविकेतील ‘डॉक्टरा’मुळे वाचले बाळ-बाळंतीणचे प्राण; भररस्त्यात पार पडली प्रसुती
शिरूर तालुक्यात घडलेल्या एका घटनेने समाजमन अजून जीवंत असल्याची प्रचिती करून दिली. शिरूर येथील जोशीवाडी येथील गरोदर महिला पोटात तीव्र वेदना होत असल्याने शिरूर ग्रामीण रुग्णालयात निघाली होती. मात्र, निर्माण प्लाझा परिसरात प्रसुती कळा वाढल्या, तिला वेदना असह्य झाल्याने ती रस्त्याच्या कडेला बसली. हा प्रकार पाहताच परिसरातील महिलांनी लगेच धाव घेत स्कार्फ, शेजारच्या घरातून साड्या आणून आडोसा निर्माण केला. काही क्षणातच तिने रस्त्यावरच बाळाला जन्म दिला.
शिरूर जोशीवाडी येथील एक गरोदर महिला प्रस्तुती कळा व पोटात दुखत असल्याने आपल्या पतीसह दुचाकीवरून शिरूर ग्रामीण रुग्णालयात निघाली होती. मात्र, निर्माण प्लाझा येथे प्रचंड प्रसूती कळा सुरू झाल्याने ती रस्त्याच्या कडेला बसली. काही कळायच्या आत तिने रस्त्यातच बाळाला जन्म दिला असे तेथे उपस्थित महिलांच्या लक्षात आले. वेळ वाया न घालता महिलांनी तोंडाचे स्कार्फ सोडून, तर काही महिलांनी शेजारील पडवळ कुटुंबाकडून साड्या आणून आडोसा निर्माण केला.
ही घटना पत्रकार सुदर्शन दरेकर यांच्या लक्षात येताच त्यांनी डॉ. संतोष पोटे याबाबत माहिती दिली. काही वेळात डॉ. सुनिता पोटे, पूजा पोटावळे, स्मिता पाटील, प्रियांका गोरे, वृषाली बोरकर, सुवर्णा चिपाडे, तनुजा अवचिते घटनास्थळी पोहचल्या. त्या ठिकाणी महिला प्रसुती झालेल्या नवजात बालकाला आपल्या मांडीवर घेतले होते. आजूबाजूचे रिक्षा चालक, मेडिकल स्टोअर चालकही यावेळी मदतीला धावून आले.
डॉ. पोटे यांनी योग्य उपचार दिल्याने काही वेळात बाळ रडू लागले. त्यानंतर बाळाला उंचावून सर्वांना बाळाचे दर्शन दिले. काही वेळापूर्वी सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवणारा तो क्षण बाळाचा चेहरा पाहताच जल्लोष आणि टाळ्यांचा कडकडाटात बदलला. नागरिकांनी उपस्थित सर्व डॉक्टर, पत्रकार, नगरसेविका व त्यांच्या मदतीला आलेले रिक्षा आणि मेडिकल चालकांचे कौतुक करून आभार मानले. त्यानंतर बाळासह त्याच्या आईला डॉ. पोटे यांच्या मिरा नर्सिंग होम येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर बाळ आणि त्याच्या आईची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. पोटे यांनी सांगितले.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.