Mumbai News – काकाच्या एन्काऊंटरचा सूड उगवला, दया नायक यांना टीप देणाऱ्या खबऱ्याला 27 वर्षांनी संपवलं
भायखळा येथील नागपाड्यात चार दिवसांपूर्वी एका वृद्ध व्यक्तीची हत्या निर्घृण हत्या करण्यात आली. सुरवातीला आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचे बोलले जात होते. मात्र पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका एन्काऊंटर प्रकरणात निवृत्त पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना टीप दिल्याप्रकरणी तब्बल 27 वर्षांनी खबऱ्याचा संपवल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
काय आहे प्रकरण?
छोटा शकील गँगचा शार्पशूटर सादिक कालिया हा नोव्हेंबर 1999 मध्ये दादर येथे एका नेत्याच्या हत्येच्या उद्देशाने आला होता. मात्र तत्पूर्वीच एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या टीमने त्याला घेरले आणि त्याचा एन्काऊंटर केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इकबाल यांनीच खबर दिल्याने काका सादिक कालियाचा एन्काऊंटर झाला, असा समज सादिक जावरचा होता. काकाचा सादिकचा एन्काऊंटर झाला तेव्हा त्याचा पुतण्या सादिक जावर हा केवळ दोन वर्षांचा होता. मात्र जसजसा तो मोठा होत गेला तसे त्याच्या मनात काकाच्या हत्येचा बदला घेण्याची भावना वाढत गेली. यातूनच त्याने आपला साथीदार नौशाद मितानी याच्यासोबत मिळून 20 एप्रिल 2026 रोजी घरी कुणी नसताना इकबाल इब्राहिम सालिया यांची घरात घुसून हत्या केली.
फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, सादिकने धारदार चाकूने इकबाल यांच्यावर 20 हून अधिक वार केले. यात इकबाल यांचा मृत्यू झाला. या हत्येनंतर आरोपींनी मुंबईतून पलायन केले. मात्र तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मुंबई क्राईम ब्रांचने त्यांचा पाठलाग करत अखेर आरोपींना नागपूरमध्ये गाठले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करत त्यांची चौकशी केली असता हत्येचा कारणाचा उलगडा झाला. पोलीस पुढीत तपास करत आहेत.
Comments are closed.