एमपीएससीच्या नव्या जाहिरातीवरून विद्यार्थ्यांमध्ये संताप; भरती प्रक्रियेत एससीसाठी शून्य जागा, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत एपूण 552 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमएपीएससीमार्फत महाराष्ट्र गट ‘ब’ अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा येत्या 14 जून 2026 ला घेण्यात येणार आहे. ही परीक्षा राज्यातील एपूण 37 जिल्हा पेंद्रांवर घेण्यात येणार आहे. परंतु या भरतीत सर्वाधिक पदे असलेल्या सहायक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक या दोन्ही पदांमध्ये अनुसूचित जाती (एससी) साठी शून्य जागा असल्याने यावर काँग्रेसने आक्षेप घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जाहिरातीत सहायक कक्ष गट-ब 6 पदे, राज्य कर निरीक्षक गट-ब (वित्त विभाग) 233 पदे, पोलीस उपनिरीक्षक, गट ब-310 पदे अशा एपूण 552 पदांचा समावेश आहे; परंतु या सर्व पदांमध्ये एकही जागा अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली नसल्याने उमेदवारांचा भ्रमनिरास झाला आहे. यावर काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या पदांसाठी आलेल्या जागेत अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना एकही जागा नाही. यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत विचार करावा व राज्य सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली नाही तर अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
Comments are closed.