बनायचं होते शिक्षक पण बनला हायफाय बाबा…; डीएड परीक्षेत नापास, नंतर बंगालमध्ये जाऊन जादूटोणा श
Manohar Mama Bhosale : मनोहर मामा भोसले…पुन्हा एकदा हे नाव चर्चेत यायचे कारणही तसेच असून महाराष्ट्राच्या राजकारणातील बडेबडे दिग्गज मंडळी आणि आता कर्नाटक आणि आसपासच्या राज्यातूनही मंत्री आमदार खासदारांचे दैवत असलेल्या हा चेहरा म्हणजे मनोहर मामा भोसले(Manohar Mama Bhosale)…मनोहर भोसले ते सद्गुरु मनोहर मामा भोसले हा त्याचा प्रवासही अत्यंत चक्रावणारा असाच आहे. सध्या त्याच्यावर भोंदूगिरी फसवणूक आणि जादूटोणा संदर्भातल्या तक्रारीनंतर पोलिसात गुन्हे दाखल झाल्यावर पुन्हा एकदा हे नाव चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे 2021 मध्ये ही भोंदूगिरी जादूटोणा खंडणी वसुली आणि महिलेवरील अत्याचार प्रकरणात करमाळा येथे सात दिवस पोलीस कोठडी राहावे लागले होते आणि त्यानंतर बरेच दिवस न्यायालयीन कोठडीत मामांना गजाआड बसावे लागले होते.(Manohar Mama Bhosale)
Manohar Mama Bhosale : वाढदिवसाला तब्बल 90 पेक्षा जास्त आमदार…
मात्र यानंतरही त्यांचे भक्त राजा बाहेर देखील वाढत गेले आणि पुन्हा एकदा मनोहर भोसले हे नाव चर्चेत आले. केंद्रीय मंत्री नितीन, गडकरी यांच्यापासून शरद पवार, सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, धनंजय मुंडे, चंद्रकांत पाटील असे डजनाने आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री यांचे फोटो या मामासोबत सोशल मीडिया व्हायरल झाले. अगदी काही दिवसापूर्वी या मामाच्या पुणे परिसरातील एका रिसॉर्टमध्ये झालेल्या वाढदिवसाला तब्बल 90 पेक्षा जास्त आमदार उपस्थित असल्याची चर्चाही त्याचे भक्तगण करीत होते. मात्र खरात नंतर पुन्हा एकदा मनोहर भोसले हे नाव चर्चेत आले. सोलापूर येथील एका व्यावसायिकाला व्यवसायात बरकत मिळावी म्हणून त्याच्याकडून 50 हजार रुपये घेतल्याचा आरोप या मामावर होता आणि यानंतर आता त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठवले आहे. (Manohar Mama Bhosale)
Manohar Mama Bhosale : डीएड परीक्षेत नापास झाल्यानंतर काही दिवस बंगालमध्ये जाऊन …..
मनोहर भोसले हे मूळचे इंदापूर तालुक्यातील लासुर्णे या गावचे.. यांना गुरुजी बनायचे होते…मात्र दोन वेळेला डीएड परीक्षेत नापास झाल्यानंतर काही दिवस बंगालमध्ये जाऊन जादूटोणा शिकून आल्याची चर्चा होती. यानंतर मनोहर भोसले यांनी आपले गाव सोडून करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे काका व मावशीकडे राहण्यास आले. यापूर्वीपासूनच त्यांनी लोकांना भविष्य सांगायला सुरुवात केली होती. यावेळी त्यांनी सांगितलेली भाकीते अनेक वेळेला बरोबर येत असत. मात्र मनोहर मामाचा हातखंडा हा अचूक भूतकाळ सांगण्यात होता आणि त्यामुळेच हळूहळू मनोहर मामाचे नाव उंदरगावची सीमा ओलांडून थेट मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा महानगरातही पोहचले.
Manohar Mama Bhosale : कोट्यावधी रुपयांच्या आलिशान गाड्यांच्या रांगा
यातूनच उंदरगाव येथे जमीन घेऊन मामा झोपडीतून थेट आलिशान आश्रमात आले. या ठिकाणी बडे बडे राजकारणी चित्रपट सृष्टीतील कलावंत आणि उद्योजकांची दर अमावस्या आणि पौर्णिमेला गर्दी होऊ लागली. अतिशय अडचणीच्या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या आश्रमाकडे जाणाऱ्या मार्गावर या वेळेला कोट्यावधी रुपयांच्या आलिशान गाड्यांच्या रांगा लागलेल्या असत. यानंतर अचानक मनोहर मामा हे सद्गुरु म्हणून चर्चेत आले. बाळूमामांचा भक्त आणि पुन्हा साक्षात बाळूमामांचा अवतार अशी इमेज मामांच्या साधकांनी त्यांची उभी केली, याच प्रसिद्धीतून करमाळ्यातील उंदरगाव हे बड्या मंडळींसाठी हॉटस्पॉट बनला.
Manohar Mama Bhosale : बाभळीचा पाला साखर भंडारा विकत घ्यायला….
मात्र दरम्यानच्या कालावधीत 9 सप्टेंबर 2021 मध्ये करमाळा पोलीस ठाण्यात मनोहर भोसले यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला. यानंतर पोलिसांनी त्यांच्या मुस्क्या आवडत गुन्हा दाखल केल्यावर न्यायालयाने 19 सप्टेंबर 2021 रोजी त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. याच कालावधीत कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला साखर भंडारा विकत घ्यायला लावणाऱ्या मनोहर मामा याच्यावर बारामती पोलीस ठाण्यातही अडीच लाखाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. यामुळेच माध्यमानी उंदरगाव येथील ग्रामस्थांच्या बाजूने मामा विरुद्ध आवाज उठवला आणि उंदरगाव येथील आलिशान आश्रम 2021 मध्ये बंद करावा लागला. सध्या उंदरगाव येथील आश्रमात मनोहर भोसले यांचे आई वडील राहत असल्याचे सांगितले जाते. मात्र यानंतर मनोहर भोसले यांनी कधीही उंदरगावात आपला दरबार भरवला नाही.
Manohar Mama Bhosale : घोटी या गावात जवळपास 27 एकर जागा खरेदी
मनोहर मामा यांचे मुख्य वास्तव्य हे पुण्यात असायचे. तिथूनच उंदरगाव सोडल्यानंतर त्यांनी करमाळ्यातील घोटी या गावात जवळपास 27 एकर जागा खरेदी केली. गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी आता एक आलिशान आश्रम उभा राहिला असून परिसरात आंबा आणि इतर फळबागांची मोठी लागवड केली आहे. मात्र घोटी येथे आश्रमाची उभारणी करताना जाण्याचा रस्ता असेल किंवा इतर बाबीत घोटी ग्रामस्थांनी मनोहर मामा यांच्यात खटके उडत राहिले. यातूनही मनोहर मामाने आपल्या राजकीय कॉन्टॅक्टचा वापर करून घोटी ग्रामस्थांवर दडपण आणायचा प्रयत्न केला होता. मात्र गावचे सरपंच विलास काका राऊत हे ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि मनोहर भोसलेचे सर्व डाव हाणून पाडले. आता मनोहर भोसलेला पुन्हा एकदा फसवणूक जादूटोणा गुन्ह्यात अटक करून पोलीस कोठडीत पाठविल्यानंतर घोटी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आता घोटी येथील मनोहर मामाचा हा आश्रम बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी आश्रमाची सखोल चौकशी करून तातडीने बंद करण्याची मागणी सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
Manohar Mama Bhosale : राज्यातील मोठे नेते कसे लागतात ….
ज्या पद्धतीने मनोहर मामांचे भक्त मामांची इमेज सोशल मीडियात सद्गुरु म्हणून बनविताना विविध राजकीय नेते आणि सेलिब्रेटी सोबतच्या फोटोंचा वापर करीत होते. ते पाहता यातील कोणतीच गोष्ट मनोहर भोसले यांच्या कामाला आली नसून आज मनोहर भोसले याला त्याने केलेल्या कुकर्मामुळे गजाआड बसायची वेळ आली आहे. असे असले तरी सध्या राज्यात ज्या पद्धतीने एकापाठोपाठ एक बुवाबाजांची प्रकरणे बाहेरीत येत आहेत ते पाहता अशा भोंदू गिरी करणाऱ्या महाराजांकडे कोणताही सर्वसामान्य भावी जात नसल्याचे समोर येत आहे. खरंतर अशा भोंदू बाबांच्या नादाला देशातील आणि राज्यातील मोठे नेते कसे लागतात हाच प्रश्न पुरोगामी महाराष्ट्राला पडला आहे. त्यामुळे आता भविष्यात तरी मोठमोठे नेते आमदार खासदार मंत्री सेलिब्रेटी अशा भोंदूगिरीला हसणार नाहीत अशीच अपेक्षा मराठी माणसाला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.