नैसर्गिक संकटामुळे आंबा उत्पादन घटले; बागायतदारांना मोठा फटका
डिसेंबर महिन्यात कडाक्याच्या थंडीमुळे मोहरल्यामुळे आंबा बागायतदारांच्या अशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे बागायतदारांची निराशा झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे फळांचा राजा असलेला हापूस आंबा संकटात सापडल्याने उत्पादन घटले आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात बाजारपेठेत दाखल होणारा आंबा हा गुढीपाडव्यानंतर बाजारपेठेत दाखल झाला.
आंब्याचे उत्पादन कमी असूनही सध्या स्थानिक बाजारपेठेत आंब्याचे दर आवाक्यात आले आहेत. वाशी मार्केटमध्ये कमी उत्पादन असल्याने आंब्यांना चांगला भाव मिळत आहे. मात्र, आंबे कमी असल्याने अपेक्षित दर नसल्याची माहिती देवगड तालुका अंबा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांनी दिली.
सध्या स्थानिक बाजारपेठेत आंब्याचा दर 700 ते 1000 रुपये प्रति डझन असून 15 मेपर्यंत बाजारपेठेत आणखी आंबा येण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नैसर्गिक आपत्तीमुळे यावर्षीचा आंबा हंगाम पूर्णता संकटात आहे. त्यामुळे यावर्षी फक्त पंधरा ते वीस टक्के आंब्याचे उत्पादन झाले, अशी माहिती काका ढोके यांनी दिली.
यामुळे दरवर्षीच्या तुलनेत आंबा 30% महाग झाला दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात तयार झालेला आंबा बागायतदार वाशी मार्केटमध्ये पाठवीत होते. यावर्षी आंबा गुढीपाडव्यानंतर आंबा विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाला. स्थानिक बाजारपेठांमध्ये 15 मार्चनंतर आंबा विक्रीसाठी दाखल झाला. सध्या स्थानिक बाजारपेठेत आंबा कमी प्रमाणात असला तरी दरही आवाक्यात आहेत. गतवर्षी एका डझनला पाचशे रुपये पासून दर होता, यावर्षी आंबा कमी असून दर 700 ते 1000 रुपये पर्यंत आहेत.
स्थानिक बागायतदार हा पुणे व मुंबई या ठिकाणी स्वतः विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याने आंब्याला बाराशे ते पंधराशे रुपये प्रति डझन दर आहे. वाशी बाजारात दलालांकडून आंब्याला अपेक्षित दर मिळाला नाही अशी खंत देखील आंबा बागायतदार मधून व्यक्त केली जात आहे
सध्या बाजारपेठेत दाखल झालेला आंबा हा अजून 15 ते 20 दिवस असल्याची शक्यता जामसंडे येथील स्थानिक अंबा विक्रेते यांनी सांगितली सध्या आंब्याचा व्यवसायालाही सुरुवात झाली असून 50 ते 55 रुपये किलो असा कॅनिंगचा आंब्याचा दर असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटनाच्या निमित्ताने देवगड मध्ये दाखल झालेले कोल्हापूर पुणे मुंबई येथील नागरिक स्थानिक बाजारपेठेत आंबे खरेदी करत असून शाळांना सुट्टी पडल्यानंतर बाजारपेठेत आंबे खरेदीसाठी गर्दी असेल असे देखील स्थानिक आंबा बागायतदारांमधून बोलले जात आहे सध्या देवगड तालुक्यात आंब्याची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या जमसंडे बाजारपेठेत आंबा खरेदीसाठी मोठी वर्दळ असल्याचे दिसून येत असून संध्याकाळी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आंबा खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे.
Comments are closed.