अशोक खरातच्या जीवाला धोका? सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांचा खळबळजनक दावा; कोर्टात नेमकं काय घडलं

अशोक खरात नाशिक कोर्टात सुनावणी : महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि जादूटोणा अशा गंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेला भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याला आज सहाव्या गुन्ह्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर नाशिक न्यायालयात (Nashik Court) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) हजर करण्यात आले. या सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी अशोक खरातला न्यायालयीन कोठडीत जीविताचा धोका असल्याचे सांगत तातडीने पुढील तपासासाठी ताबा मिळण्याची मागणी केली.

Ashok Kharat Nashik Court Hearing: न्यायालयीन कोठडी आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद

सहाव्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी देण्यात आलेली तीन दिवसांची पोलीस कोठडी आज संपली. सरकारी पक्षाने न्यायालयात खरातची पोलीस कोठडीचे हक्क राखून त्याला न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केली. मात्र, याच वेळी सरकारी वकिलांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला की, खरातला न्यायालयीन कोठडीत (जेलमध्ये) ठेवणे धोक्याचे ठरू शकते. सुरक्षेच्या कारणास्तव आणि तपासातील सातत्य राखण्यासाठी त्याला आजच पुढील गुन्ह्यासाठी ताब्यात मिळावे, अशी विनंती करण्यात आली.

Ashok Kharat Nashik Court Hearing: पुढील गुन्ह्यात ताबा घेण्याची तयारी

न्यायालयाने अशोक खरातला सहाव्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. परंतु, त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची मालिका मोठी असल्याने, विशेष तपास पथक (SIT) आजच त्याला सातव्या गुन्ह्यासाठी न्यायालयीन कोठडीतून पुन्हा आपल्या ताब्यात घेणार आहे. यासाठी तपास यंत्रणेने न्यायालयात रीतसर अर्ज सादर केला आहे.

अशोक खरात नाशिक कोर्टात सुनावणी : न्यायाधीश शंचा अशोक खरातला प्रश्न, भोंदूबाबा म्हाणाला.

सुनावणी दरम्यान, न्यायमूर्तींनी अशोक खरातला “तुझी पोलिसांच्या विरोधात काही तक्रार आहे का?” अशी विचारणा केली. त्यावर खरातने “नाही” असे उत्तर दिले. खरातवर आतापर्यंत अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, दररोज नवनवीन पुरावे समोर येत आहेत. आजच पुन्हा त्याचा ताबा तपास यंत्रणा घेणार असून पुढील तपासात नेमकं काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Nashik Crime News: ऑफिसमधील केबिननंतर आता अशोक खरातच्या फार्महाऊसमधील नको नको ते व्हिडीओ SIT च्या हाती; महिलांसोबत काय काय केलं, कूकने केला भांडाफोड!

Ashok Kharat Case: भोंदूचा कारनामा…पहिले मोकळा हात दाखवला, मग हवेतून काजू कतली काढली आणि अशोक खरात म्हणाला…

आणखी वाचा

Comments are closed.